जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट निर्देश : महामार्ग सहापदरीकरण कामकाज बैठकीत ‘रिलायन्स’ला धरले धारेवराारा : टोलविषयी जनतेत मोठा रोष आहे. मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या रांगा टोल व्यवस्थापनाने बंद होण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशा सक्त सूचना देतानाच केलेल्या उपाययोजना तपासण्यासाठी विशेष पथकाच्या निर्मितीचे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या सहापदरीकरण कामकाजाबाबत जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, प्रांताधिकारी रवींद्र खेबूडकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अमृत नाटेकर, वाईचे प्रांताधिकारी अस्मिता मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे एस. डी. पोतदार आदी उपस्थित होते.आनेवाडी टोलवर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. यामधून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत हा विषय आपण गांभीर्याने घ्यावा, नाहीतर जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव करून दिली. ‘केलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी, असे सांगितले. यावर रिलायन्सचे एस. बी. सिंग आम्ही काळजी घेत असल्याचे म्हणाले. मुदगल म्हणाले, ‘आपण खोटे बोलत आहात. १० सेकंदामध्ये वाहन पुढे गेले पाहिजे. रस्त्याच्या कामाबाबत असणारे अडथळेही दूर करुन दिले आहे. येणाऱ्या काळात अतिरिक्त वाहतुकीचे योग्य नियोजन करावे.’नाटेकर म्हणाले, ‘शिवराज पेट्रोल पंप, वाढेफाटा, पाचवड, भुईंज, लोणंद फाटा या चार ठिकाणी पुलाच्या बांधकामाचे काम लवकरच सुरु होणार आहे, तर खिंडवाडी आनेवाडी, उडतारे, बोपेगाव, जोशी विहीर, सुरुर या ठिकाणच्या पुलांवरुन ३१ डिसेंबरपूर्वी वाहतूक सुरु होईल. आवश्यक त्या ठिकाणी असणारे अडथळे पोलीस बंदोबस्तात दूर करण्यात येतील.या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. वाघमारे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे संभाजी गावडे, पोलीस निरीक्षक संजय सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, अनुपम कुमार, प्रकल्प समनवयक बी. के. सिंग, राजकुमार कटारिया आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)...तर टोलवसुली नकोटोलवरील असणारी मुले नाहक त्रास देतात. त्यांच्याकडून सौजन्यपूर्ण वागणूक दिली गेली पाहिजे. आपण कोणत्या उपाययोजना करत आहात, याबाबत तपासणीसाठी एक पथक निर्माण करण्यात येईल व या पथकाकडून नियंत्रण ठेवण्यात येईल. रांगा लागल्या तर त्यांच्याकडून टोल वसुली न करता पुढे सोडावे व वाहतुकीची कोंडी मोकळी करावी, असेही जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले. मदत पुरवूनही कामात कुचराई : अभिनव देशमुखडॉ. अभिनव देशमुख म्हणाले, ‘आवश्यक त्यावेळी आणि त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा देण्यात येते. परंतु आपल्याकडून कामात कुचराई केली जाते. अनेक ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी अत्यंत अरुंद मार्ग आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आणि अतिशय उंच असे स्पीडब्रेकर निर्मिती केली आहे. वळणाच्या ठिकाणी फलक लावावेत. रेडियम लावावे. पुलाच्या ठिकाणी रेडियम आणि रिफ्लेक्टर लावावेत. याचा आढावा वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन शाखेने घ्यावा.
रांगा लागल्यास टोल न घेता वाहने सोडा
By admin | Published: December 03, 2015 10:40 PM