शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शिवसेनेने आघाडीसमोर प्रस्ताव ठेवल्यास निश्चित चर्चा करू :पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 5:50 PM

भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली व त्यांना निसटता कौलही मिळालाय. त्यामुळे स्थिर सरकार देण्याची जबाबदारी आता दोघांचीही आहे. तरीही त्यांच्यातील सरकार स्थापनेतील वाटाघाटी फिसकटल्या आणि शिवसेनेने आघाडीसमोर ठोस प्रस्ताव ठेवला तर त्याबाबत मित्रपक्षांसह पक्षश्रेष्ठींशी निश्चितपणे चर्चा करू, अशी भूमिकाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्दे शिवसेनेने आघाडीसमोर प्रस्ताव ठेवल्यास निश्चित चर्चा करू :पृथ्वीराज चव्हाण राज्यात युतीला निसटता कौल; स्थिर सरकार देण्याची जबाबदारी दोघांचीही

कऱ्हाड /मलकापूर : भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांनी निवडणूक एकत्र लढवली व त्यांना निसटता कौलही मिळालाय. त्यामुळे स्थिर सरकार देण्याची जबाबदारी आता दोघांचीही आहे. तरीही त्यांच्यातील सरकार स्थापनेतील वाटाघाटी फिसकटल्या आणि शिवसेनेने आघाडीसमोर ठोस प्रस्ताव ठेवला तर त्याबाबत मित्रपक्षांसह पक्षश्रेष्ठींशी निश्चितपणे चर्चा करू, अशी भूमिकाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केली आहे.कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात निवडणूक निकालानंतर आयोजित पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषदेच्या सदस्या मंगला गलांडे, पंचायत समितीचे सदस्य नामदेव पाटील, उत्तमराव पाटील, शिवराज मोरे, जयवंत जगताप, इंद्रजित चव्हाण, नानासाहेब पाटील, अ‍ॅड. नरेंद्र पाटील, कऱ्हाडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, श्रीकांत मुळे, आपीपा माने, मोहनराव शिंगाडे, नारायण रैनाक आदी उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आम्ही आपापले मतदारसंघ पदरात घेण्याचे नियोजन केले होते. तर शरद पवार यांच्याप्रमाणे काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांच्या अजून सभा झाल्या असत्या तर सत्तांतर झाले असते. आताच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे.

आजपासून जनतेच्या कामांसाठी सज्ज झालोय. ज्यांनी मतं दिली आणि ज्यांनी दिली नाहीत त्या सर्वांचाच मी प्रतिनिधी आहे. कऱ्हाड दक्षिणेतील जनतेचे आभार मानून हा प्रतिनिधी यापुढे कोणताही भेदभाव न करता गरजेनुसार कामे करण्यास बांधील आहे.सध्या राज्यात परिस्थिती गंभीर आहे. जनतेच्या प्रश्नासाठी सरकार स्थापनेला उशीर करता कामा नये, असे सांगून चव्हाण पुढे म्हणाले, ह्यशिवसेना नेते सत्तेतील ५० टक्के वाट्याबाबत बोलत असून, ते भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबतच्या चर्चेत तसे ठरल्याचे सांगतात. तर दुसरीकडे मुख्यमंत्री अशा कोणत्याही गुप्त वाटाघाटी झाल्या नसल्याचा दावा करतात. त्यामुळे दोघांपैकी एकजण निश्चितपणे खोटे बोलत आहे.

सध्या महाराष्ट्रातील जनतेला झुलवत ठेवण्यापेक्षा भाजप-सेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन काय ठरलंय ते सांगावे. आत्ताच जर एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण झाला तर हे सरकार कसे स्थापन होईल, याबाबत शंका आहे.ह्णवंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आघाडीला २५ ठिकाणी फटका बसला, हे खरे आहे. मात्र, त्या मतदारसंघात वंचितऐवजी आपले आमदार निवडून आणण्यासाठी महायुतीलाच फायदा झालाय. लोकसभा निवडणुकीवेळीही आम्ही वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करण्यासाठी तयार होतो.

आम्ही एकत्र लढलो असतो तर स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार झाले असते. तसेच त्यांचे अन्य सहा ते सातजण विजयी झाले असते. वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष विस्तारवाढीला आमचा विरोध नाही. मात्र, विधिमंडळात राहून आपण आपला पक्ष वाढवावा, एवढेच आम्ही त्यांना सांगत होतो, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.काँग्रेस मजबूत झाली पाहिजे...अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी भेटून माझे अभिनंदन केले. विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे ३५ वर्षे आमदार होते. त्यांच्यावतीने त्यांचे चिरंजीव निवडणुकीत उभे होते. त्यांना पडलेली मते ही काँग्रेसची आहेत. या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी मला येऊन भेटून शुभेच्छा दिल्या. काँग्रेस मजबूत झाली पाहिजे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ते काँग्रेसच्या विचाराचे असल्याने त्यांचे मी आभार मानतो, असेही चव्हाण यांनी सांगितले.भाजपच्या सत्तेचा अहंकार उतरवला...महाराष्ट्रातील निकाल पाहता भाजपच्या विरोधी कौल दिला गेला आहे. सत्तेचा गैरवापर, पैशाचा दुरुपयोग जनता सहन करीत नाही. जनतेला कुणी गृहीत धरू नये, हाही संदेश राज्यातील जनतेने दिला आहे. त्यातून भाजपच्या सत्तेचा अहंकारही जनतेने खाली उतरवलाय, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर