सातारा : खटाव तालुक्याच्या कलेढोण परिसरातील १६ व माण तालुक्याच्या कुकुडवाड गणातील १६ गावांसाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे. त्याचबरोबर महिन्यात सर्व्हे होऊन कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात छावणी उभारणार आहे, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी हा इशारा दिला आहे. त्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे, चिन्मय कुलकर्णी, तानाजी काटकर, विक्रम काटकर, एम. जे. काटकर, चांगदेव काटकर, माणिक काटकर, ब्रम्हदेव पुकळे, दीपक खताळ, राम देशमुख, संजीव साळुंखे, अनिल भोसले, आप्पासाहेब लिगाडे, अतुल देशमुख आदी उपस्थित होते.गारळे म्हणाले, खटाव तालुक्याच्या कलेढोण भागातील १६ गावांसाठी कोणत्याही योजनेतून पाणी मिळत नाही. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी जिल्ह्याच्या सीमेवरुन टेंभू येजेनेचे पाणी जात आहे. त्यामुळे या गावांना हे पाणी मिळण्यास कोणतीही अडचण नाही. त्यातच शासनही काही करत नसल्याने या भागातील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतलाय. या भागात आटपाडी पॅटर्नप्रमाणे पाणी मिळण्याची गरज असून ते सोयीचे ठरणारे आहे.कुलकर्णी म्हणाले, पाण्यासाठी या भागातील लोकांनी लढा सुरू केलाय. याला कारण म्हणजे धरणे सातारा जिल्ह्यात आणि पाणी जाते पुणे, सांगली व सोलापूर जिल्ह्यात. हे पाणी देण्यास आमचा विरोध नाही. पण, अगोदर सातारा जिल्ह्यातील शेतीला आणि लोकांना पाणी मिळायला हवे. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व जिल्ह्यातील सर्व आमदारांनी साताऱ्यात या गावांच्या पाण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच याबाबत एक महिन्याच्या आत सर्व्हे होऊन कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात जनवारांची छावणी उभारणार आहे.अस्तित्वाच्या लढाईसाठी धरण फोडण्याचाही इशारा...या पत्रकार परिषदेत माण आणि खटाव तालुक्यातील या संतप्त ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. अस्तित्वाच्या लढाईसाठी आता आम्ही निर्णय घेऊन पाणी येत नाही तोपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार घालणार आहे. रस्त्यावर उतरु, जेलभरो आंदोलन करु. प्रसंगी धरणेही फोडू पण, आमच्या हक्काचे पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. तरच आमची होरपळ थांबणार आहे, अशा तीव्र शब्दांत त्यांनी व्यथा मांडली.
महिन्यात पाण्याबाबत सर्व्हे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात छावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 10:50 AM
सातारा : खटाव तालुक्याच्या कलेढोण परिसरातील १६ व माण तालुक्याच्या कुकुडवाड गणातील १६ गावांसाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत येणाऱ्या ...
ठळक मुद्देमहिन्यात पाण्याबाबत सर्व्हे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात छावणी१६ गावांसाठी पाणी मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार