शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

मनधरणी आॅफर’ अन् ‘दमबाजी’सुद्धा!

By admin | Published: November 03, 2016 11:50 PM

कऱ्हाड पालिका निवडणूक : आघाड्यांचे नेते अपक्षांच्या दारात

 कऱ्हाड : येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत अनेकांच्या दांड्या गुल होतील, अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात मात्र २४१ पैकी फक्त पाच अर्जच अवैध ठरले. अन् निवडणुकीच्या सारीपाटावर अपक्षांची मनधरणी सुरू झाली आहे. त्यासाठी त्यांच्यावर विविध आॅफरचा वर्षावही सुरू आहे. तर त्याहीपुढे जाऊन काही उमेदवारांना अर्ज माघारीसाठी दमबाजी केली जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कऱ्हाडच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. गत पालिका निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समर्थकांना धूळ चारत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित लोकशाही आघाडीने बाजी मारली. हा पराभव तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जिव्हारी लागणाराच होता. मात्र, मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत त्यांनी कऱ्हाडवर सुमारे १८00 कोटींच्या विकासकामांचा वर्षाव केला आणि विधानसभा निवडणुकीत याच कऱ्हाडकरांनी भरघोस प्रेम व्यक्त करीत पृथ्वीराज चव्हाण यांना ‘जनाधारा’ची भेट दिली. त्यामुळे जबाबदारी वाढलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीत ‘जनशक्ती’ची मोट बांधत संपूर्ण पॅनेल आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीतही कऱ्हाडकर बाबांवर तेच प्रेम व्यक्त करणार का? हे पाहावे लागणार. दुसरीकडे कऱ्हाडचे सलग चाळीस वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दिवंगत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचे वारसदार ‘लोकशाही’वर विश्वास ठेवून रिंगणात उतरले आहेत खरे! पण त्यांना कशी‘बशी’ २२ उमेदवारांपर्यंतच मजल मारता आली आहे. भाजपने सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, स्वप्नील भिंगारदेवे आदींच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये ‘कमळ’ फुलविण्याचा मानस केला आहे. पण त्यांनाही नगराध्यक्षांसह पंधरा उमेदवारांनाच पक्षीय चिन्हावर रिंगणात उतरवणे शक्य झाले आहे. भाजपच्या या ‘एन्ट्री’ने प्रस्थापितांची डोकेदुखी वाढली आहे, हे मात्र नक्की. कऱ्हाड शहरात बस्तान बसवू इच्छिणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांनी भाजपशी हातमिळवणी करीत भाजपने उमेदवार न दिलेल्या ठिकाणी आपले अकरा उमेदवार कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडीच्या माध्यमातून उतरवले आहेत. शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ काही प्रभागातच पोहोचला आहे. तर एमआयएमचा ‘पतंग’ मोजक्या प्रभागातच उडणार आहे. मनसेने आपले ‘इंजिन’ लोकशाहीच्या दारात नेऊन उभे केले आहे. तर मानवाधिकार पार्टीने निवडणुकीपूर्वीच आपला गाशा गुंडाळला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर अपक्षांना चांगलाच ‘भाव’ आला आहे. पॅनेल टू पॅनेल उमेदवार उभे करण्यासाठी लोकशाही, भाजप, कऱ्हाड शहर नागरी विकास आघाडी हे तिघेजण अपक्षांना पुरस्कृत करू इच्छित आहेत. त्यासाठी त्यांची मनधरणी केली जात आहे. या उलट काही प्रभागांमध्ये तिरंगी तर काही प्रभागात दुरंगी लढतीची शक्यता दिसत आहे. येथे दुसरा जादा उमेदवार येऊ नये, ज्या आघाडीला उमेदवार मिळालेला नाही त्यांना उमेदवारच मिळू नये किंवा अपक्षांनी मते खाऊ नयेत, यासाठी ‘अर्थपूर्ण आॅफर’ही काहींना मिळत आहेत. ढ कऱ्हाडच्या राजकारणात सुरुवातीपासूनच दंडनीती सुरू झाल्याची चर्चा आहे. जे अपक्ष उमेदवार माघार घ्यायच्या मन:स्थितीत नाहीत किंवा नकार देत आहेत, अशा उमेदवारांना दमबाजी सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे कऱ्हाडची निवडणूक अंतिम टप्प्यात आणखी काय वळणे घेणार? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. (प्रतिनिधी)