सातारा : ‘सातारा जिल्हा हा सवतीचा जिल्हा असल्यासारखी वागणूक राज्यातील देवेंद्र सरकार देत आहे. जिल्'ातून ९०० कोटी रुपयांचा महसूल शासनाला जातो. मात्र जिल्'ातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांचे प्रश्न सोडविण्याची दानक सरकारमध्ये नाही. पालकमंत्री हतबल आहेत, अधिकारीही हतबल आहेत, आता तुम्हीच सरकारविरोधात वात पेटवा, या अग्नीतून सरकार पेटवा,’ असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे केले.
जिल्'ातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँगे्रसच्या वतीने वीज वितरण कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे भव्य सभा घेण्यात आली. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सभापती शिवाजीराव सर्वगौड, वनीता गोरे, जिल्हा परिषद सदस्य जयवंत भोसले, मंगेश धुमाळ, किरण साबळे-पाटील, अॅड. नितीन भोसले, राजकुमार पाटील, श्रीनिवास शिंदे, बाळासाहेब महामुलकर, गोरख नलावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘जिल्'ातील शेतकºयांनी वीज पंपाची वीज घेण्यासाठी २५ कोटी रुपये वीज कंपनीकडे जमा आहेत. तब्बल १३ हजार शेतकºयांनी वीज कनेक्शनची मागणी केली. तरीदेखील विदर्भाचा बॅकलॉग पुढे करत शेतकºयांवर अन्याय केला जातोय. वीज कनेक्शन दिली जात नाहीत. जिल्'ातील ९० टक्के वीज बिल वसुली असतानाही राज्याच्या थकबाकी दाखवून लोकांची दिशाभूल केली जाते. आम्ही आता वीज बिल भरू नका म्हणून जनतेला आव्हान करणार आहोत. कोण वीज तोडायला आला तर त्याला करंट देऊ, संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. ती मिळेपर्यंत राष्ट्रवादी सरकारला सोडणार नाही. या सरकारने अनेक पापी पुण्यवान करून घेतले. २६ मंत्री भ्रष्टाचारात अडकले असले तरी अजूनही मुख्यमंत्री म्हणतात आमचे सरकार क्लीन आहे. हे सरकारच बेशरम आहे.राष्ट्रवादीविरोधात बळाचा वापरराष्ट्रवादी काँगे्रसविरोधात सरकार बळाचा वापर करत आहे. राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांच्याविरोधात मोक्का लावत असताना वरून प्रेशर वापरले गेले. राजकीय व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त करण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी. सर्वसामान्य शेतकºयांची जमीन जात असताना त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाºयांवर मोक्का लावला जातो. हे दुर्दैवी आहे. त्यांच्या मोक्याचा फेरविचार केला जावा, अशी मागणीही आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चेत केली.