फूलझाडांना बहर (फोटो : १८ इन्फोबॉक्स०२)
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने सौंदर्याच्यादृष्टीने आयलॅन्डमध्ये विविध प्रकारची फूलझाडे लावण्यात आलेली होती. त्याची सध्या काळजी घेतली जात आहे. दिवसात एकदा त्यांना पालिकेकडून पाणी दिले जात असल्याने या फूलझाडांना चांगलाच बहर आला असून ही फूलझाडे शहराची शोभा वाढवित आहेत.
झाडांचा धोका
कऱ्हाड : सुपने-किरपे दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. वाढलेल्या झाडांमुळे वळणावर समोरून आलेले वाहन दिसत नाही. परिणामी, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता चांगला असल्याने या रस्त्यावरून वाहने सुसाट जात असतात. त्यातच पुढचे वाहन न दिसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
प्लास्टिकचा वापर
कऱ्हाड: प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असूनही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा चोरी-छुपे वापर केला जात आहे. पालिकेच्या दंडात्मक कारवाईची मोहीम थंडावली असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. काही व्यापारी, दुकानदार व फळविक्रेते अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत.