शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
3
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
4
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
5
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
6
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
7
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
8
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
9
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
10
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
11
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
12
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
13
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
14
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
15
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
16
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
17
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
18
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
19
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
20
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...

चूक माणसाची शिक्षा मोराला; साताऱ्यातील सेल्फी मोराचे नियमबहाय्य स्थलांतर!

By प्रगती पाटील | Published: June 10, 2024 5:19 PM

वन कर्मचारीच वन कायद्याविषयी अनभिज्ञ असल्याचा आरोप

सातारा : गोळीबार मैदान येथील नाचणाऱ्या मोराचे वनविभागाच्या हस्तक्षेपाने नुकतेच स्थलांतर करण्यात आले आहे. हे स्थलांतर नियमबाहय्य असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. कोणत्याही वन्यजीवाचे स्थलांतर करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबीचा विचार न करता हे स्थलांतर केले गेल्याचे आक्षेप वनविभागावर घेण्यात आले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, मागील काही दिवसांपासून गोळीबार मैदान परिसरामध्ये एक मोर प्रणयाराधन अथवा प्रजननाकरिताच्या प्रदर्शनासाठी पिसारा फुलवून नाचत होता. या दरम्यान परिसरातील लोकांच्या तो नजरेस पडला व तेथे दररोज त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. याविषयी सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रे या माध्यमातून लोकांना मोराच्या या कृतीमध्ये त्यास बाधा अथवा हानी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य अथवा हस्तक्षेप न करण्याचे आवाहन वनविभागाने करणे अपेक्षित असतानाही त्यांच्याकडून याबाबत काहीच जनजागृती झाली नाही.वन विभागाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर विभागाने तेथे एक दिवस लोकांना हटकण्याचे काम केले. परंतु त्यानंतर वनपाल व कर्मचाऱ्यांनी स्वतःच हा मोर पकडून दुसऱ्या अधिवासात सोडण्यात आल्याचे सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची लेखी परवानगी घेण्याचेही परिश्रम या कर्मचाऱ्यांनी घेतले नसल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.या कारणांनी बदलला जातो अधिवासकोणत्याही वन्यजीवाचा अधिवास बदलायचा असेल तर त्यासाठी प्रधान मुख्य वनसरंक्षरक (वन्यजीव) नागपूर यांची लेखी परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी देण्यापूर्वी वन्यजीवाला अपघातात काही दुखापत झाली असेल तर, मानवीवस्ती मध्ये येऊन वन्यजीव त्यांना त्रासदायक ठरत असेल तर आणि आपल्या नैसर्गिक अधिवासाचे नुकसान करत असेल तरच वन्यजीवांचे स्थलांतर करायला परवानगी दिली जाते. याशिवाय अन्य कोणत्याही कारणांनी ही परवानगी दिली जात नसल्याचे वनअधिकाऱ्यांनी सांगितले.

मान्सूनच्या पूर्वसंध्येला वळीवाच्या उत्तरार्धापासून ते मध्य पर्जन्य हंगामापर्यंत मोर पिसारा फुलवून आपल्या साैंदर्याचे प्रदर्शन करतात. सर्वसाधारणपणे हा हंगाम मोरांचा विणीचा हंगाम असतो. त्यामुळे ही क्षेत्रे ही वन्यजीवांची बेडरूम असतात. अशा ठिकाणी नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्याएेवजी संबंधीत मोराचे केलेले स्थलांतर म्हणजे त्याला थेट दुसऱ्याच्या घरात सोडण्यासारखे आहे. वन विभागाची ही कृती नियमबहाय्य आहे. यात दोषींवर कारवाइ करण्यात यावी. - सुनील भोईटे, माजी मानद वन्यजीव रक्षक, सातारा.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग