शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

विसर्जन कण्हेर तलावात..! ऐनवेळी निर्णय , साताऱ्यातील विसर्जनाचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 23:28 IST

गणेश बाप्पांच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मेढा रस्त्यावरील कण्हेर धरणाजवळील तळ्याचा मंडळांनी विचार केल्यास साताऱ्यातील विसर्जनाचा प्रश्न निकाली निघेल.

ठळक मुद्देछोट्या मूर्तींसाठी पोहण्याचे तलाव, गोडोली तलावाचाही पर्याय

सातारा : गणेश बाप्पांच्या मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी मेढा रस्त्यावरील कण्हेर धरणाजवळील तळ्याचा मंडळांनी विचार केल्यास साताऱ्यातील विसर्जनाचा प्रश्न निकाली निघेल. बुधवारी याबाबतची पाहणीही पोलीस दलाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच हुतात्मा, कल्याणी शाळा, दगडी शाळा व पोहण्याचे जलतरण याठिकाणी घरगुती व कमी उंचीच्या गणपतींचे विसर्जन केले जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

पोलीस करमणूक केंद्रामध्ये झालेल्या गणेश मंडळांचे पदाधिकाºयांच्या बैठकीत अधीक्षक देशमुख बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, मुख्याधिकारी शंकर गोरे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ उपस्थित होते.

अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, ‘अवघ्या काही तासांमध्येच गणेश बाप्पांचे आगमन होत आहे. विसर्जनाच्या प्रश्न निकालात निघावा, यासाठी बुधवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने सातारा शहरासह परिसरातील तळ्यांची पाहणी करण्यात आली. स्थानिक प्रशासनाच्या वतीने चार ठिकाणी गणेश बाप्पांचे विसर्जन करण्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने घरगुती व पाच ते आठ फुटांपर्यंतच्या छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.

सध्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांना यंदा साधारण किती मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. याचा अंदाज घेण्यात आला. ही चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांना मेढा रस्त्यावरील कण्हेरच्या तळ्यामध्ये विसर्जन करण्याची विनंती केली. यावर ते तळे लांब असल्याचे गणेशभक्तांनी सांगताच १५ ते २० फूट असणाºया गणेशमूर्ती मुंबईवरून आणल्या जातात, मग सातारा ते कण्हेर तळे हे अवघे १३ किलोमीटरचे अंतर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक देशमुख यांनी दिली.गणेश मंडळांच्या निर्णयाकडे लक्षमोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासनाकडून कण्हेर तळे सुचविण्यात आले असले तरी अद्याप विसर्जनाचा निर्णय झाला नाही. दोन दिवसांमध्ये गणेश मंडळांनी यासंदर्भात आपली भूमिका सांगावी, असे आवाहन यावेळी बैठकीत पोलिसांकडून करण्यात आले आहे.