शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

सरसकट 'आले' खरेदीचा निर्णय सर्वत्र राबवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी 

By दीपक शिंदे | Published: June 24, 2024 7:38 PM

..अन्यथा रोषाला सामोरे जाण्याचा इशारा

सातारा : व्यापारी प्रतवारीनुसार आले खरेदी करताना जुने आले फक्त खरेदी करत होते, तर नवीन आले तसेच रानामध्ये टाकून देत होते. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेला आठवडाभर रान उठवले होते. प्रतवारीनुसार सौदे करणाऱ्या व्यापाऱ्यांची लायसन्स रद्दबातल करा, अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आंदोलन आले उत्पादकांचा रेटा आणि लोकमतची लेखमाला यांच्या रेट्यामुळे सातारा बाजार समितीने बैठक घेत प्रतवारीनुसार आले खरेदी करता येणार नसल्याचे जाहीर केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय जिल्हाभर तसेच सांगली जिल्ह्यातही लागू करावा, अशी मागणी केली आहे.आले उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला दिले. त्यानुसार आले व्यापाऱ्यांनी उत्पादकांना सौदा पट्टी दिली पाहिजे. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही अधिकृत लायसन्सधारक व्यापाऱ्यांना माल द्यावा, यासाठी बाजार समितीने प्रबोधन करावे, अशा मागण्या यावेळेला करण्यात आल्या.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल पवार, युवा प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके, खटाव तालुकाध्यक्ष दत्तू काका घार्गे, तालुका संघटक संतोष पंडित, अनिल गायकवाड, प्रशांत जाधव, राहुल निकम, आनंदराव कदम, दीपक मोहिते आदी उपस्थित होते.

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीप्रमाणे जिल्ह्यातल्या इतर बाजार समित्यांनी आले खरेदीदार व्यापाऱ्यांनी आल्याचे सौदे सरसकट करावेत, यासाठी आग्रह धरावा. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पुन्हा प्रतवारीचे भूत बसू देणार नाही. खरेदी सरसकट होणार नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून धाडसत्र सुरू करेल. त्यातून कायदा सुव्यवस्था निर्माण झाली तर प्रशासन जबाबदार असेल. -अनिल पवार, राज्य प्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना