व्यावसायिकांचा सूर : वापरलेल्या तेलातील पदार्थ खाणं वाढवतंय हृदयाचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : वापर केलेल्या तेलाचा पुन्हा वापर करणे हा गुन्हा आहे. मात्र, एकदा वापरलेले तेल फेकून दिल्यानंतर पदार्थ बनविण्याचा खर्चाचा आकडा वाढेल जो सामान्यांना न परवडणारा असेल. त्यामुळे हातगाड्यासह हॉटेलमध्येही या तेलाचा सर्रास वापर केला जातो. वापरलेल्या तेलातून निघणारे ट्रान्स फॅट हृदयासाठी घातक आहेत.
बहुतांश हॉटेल, रेस्टॉरंट, स्नॅक्स सेंटरमध्ये खाद्यपदार्थ तळण्यासाठी एकदा तेल टाकल्यानंतर त्याच तेलात वेगवेगळे पदार्थ तळतात. वास्तविक पाहता प्रत्येक पदार्थासाठी वेगळं तेल वापरणे आवश्यक आहे. पण ते परवडत नसल्याने तेलाचा पुनर्वापर होत आहे. लोकही विचार न करता स्वादिष्ट अन् चविष्ट लागल्यावर पदार्थ आवडीने खातात. जिभेचे हे चोचले अवघ्या शरीराला त्रास देणारे आहेत.
वडे, भजी, पुऱ्या, सामोसे, कचोरी असे पदार्थ वारंवार तळलेल्या तेलाचा वापर करून करतात. हेच पदार्थ आपण आवडीने खातो. अशा पुनर्वापर करून तेलात तळलेले पदार्थ खालल्यामुळे घसा दुखणे, पोटाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोगासारखे आजारही बळावू शकतात.
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) तेलाचा पुनर्वापर वाढवतोय कॉलरेस्ट्रॉल
(कोटला फोटो आहे)
तेलात फॅटी अॅसीड असतात. पुनर्वापर केलेल्या तेलाचे फॅटी अॅसीडचे रूपांतर ट्रान्स फॅट्समध्ये होते. हे ट्रान्स फॅटस कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयावर परिणाम करतात. त्यामुळे बाहेर खाताना तळलेले पदार्थ टाळणे हा उत्तम पर्याय आहे. कार्यालयीन दौऱ्यांच्या निमित्ताने बाहेर पडणं होत असेल तर घरात केलेला चिवडा, ड्रायफ्रूट्स, फळे हा आहार ठेवणं सर्वोत्तम.
- प्रीती रेवले, आहारतज्ज्ञ, सातारा
या पर्यायांचा विचार होणे आवश्यक आहे
नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने फिरणे होत असल्याने अनेकांच्या खाण्याचा प्रश्न उद्भवतो. अशा वेळी घरून सुक अन्न नेणं उपयुक्त ठरते. यात पौष्टीक लाडू, भाजून केलेला चिवडा, भडंग, सुकामेवा हे सोबत ठेवणे उपयुक्त आहे. ज्याही ठिक़ाणी फिरताय तिथे स्थानिक फळांचा आस्वाद घेणंही आरोग्यदायी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. स्नॅकिंगची हौस भविष्यात अनेक आजारांचे निमित्त ठरू शकते याचे भान ठेऊन अन्नाचे सेवन करावे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.
२) रस्त्यावर न खाल्लेलेच बरे
बाहेर मिळणाऱ्या तळलेल्या पदार्थांचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. हातगाडीवर वडा तळणाऱ्या व्यावसायिकाला तेलाचे पुनर्वापर टाळणे केवळ अशक्य आहे. घरातही एकदा वापरलेले तेल कोणी टाकून देत नाही, त्यामुळे व्यावसायिक तर सर्रासपणे तेलाचा पुनर्वापर करतात. त्याचा आपल्या शरिरावर विपरीत परिणाम होणार असेल तर ते अन्नपदार्थ न खाणं हा उत्तम पर्याय आहे. अगदीच तळलेले पदार्थ खायचेच असतील तर मग रेडी टू फ्राय पदार्थ घरी आणावेत आणि ते घरात तळूण खाणे हा एक पर्याय असू शकतो.
३) घरचे अन्न उत्तमच (कोटला फोटो आहे)
बाहेर खाणं किंवा पार्टी करणं ही जीवनशैली धोक्याची ठरत आहे. धावपळीच्या या जगण्यात व्यायाम करायला वेळ नाही. त्यामुळे अन्न पोटात राहून त्यातून घातक आजार जडू लागले आहेत. बाहेरचं अन्न खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढून त्याचा त्रास हृदयाला होत आहे. त्यामुळे बाहेरचे मसालेदार अन्नाऐवजी सात्त्विक जेवणाला प्राधान्य द्यावे.
- डॉ. सुरेश शिंदे, सातारा