पाचवड : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या सहापदरीकरणाचे काम ठेकेदाराच्या अनागोंदी कारभारामुळे सतत वादात राहिले. सुरूर येथील थरकंप सुटलेला उड्डाणपूल, भुर्इंज येथील ढासळलेला उड्डाणपूल, पाचवडचा सतत भगदाड पडत असलेला उड्डाणपूल, खचलेले भराव यामुळे वेळ्यापासून ते शेंद्रेपर्यंतची जनता महामार्गाच्या निकृष्ट कामामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या विळख्यात अडकलेली आहे. अशा परिस्थितीत महामार्गावरील समस्यांनी भेदरलेल्या जनतेला ‘न्हाई’ने टोलदरवाढीचा झटका दिला आहे.
महामार्गावरून सततची ये-जा करणारे प्रवासी, वाहनचालक, शेतकरी यामध्ये बऱ्याचअंशी स्थानिकांचीच संख्या जास्त आहे. या सर्वांकडून घेण्यात येणारा टोल व करण्यात आलेल्या सुविधा यामध्ये मोठी तफावत आहे. ठेकेदारांनी सहापदरीकरणाच्या कामामध्ये केलेली दिरंगाई, खड्ड्यांमुळे झालेले अपघात, यामध्ये नागरिकांचे गेलेले निष्पाप जीव, उड्डाणपुलांना पडलेली भगदाडे, आवश्यक असतानाही तयार न करण्यात आलेले कॅटल पास अशाप्रकारच्या ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या कामामुळे या सहापदरीकरणाच्या एकंदरीत दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशी परिस्थिती असतानाच आता १ एप्रिलपासून आनेवाडी टोलनाक्याच्या टोलदरवाढी झटका वाहनचालकांबरोबरच समस्त जनतेला बसणार आहे. या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम वेळेत पूर्ण करून देण्यात संबंधित ठेकेदाराला अपयश आले असतानाच आता टोलदरवाढीमुळे वाहनचालक व प्रवाशांच्या खिशावरच डल्ला मारून ठेकेदाराच्या सर्व चुकांवर पांघरूण घालत त्यांची पोटली जनतेच्या जीवावर भरून देण्याचे काम या टोलदरवाढीमुळे होणार आहे.मध्यरात्रीपासून टोलवाढ...टोल व्यवस्थापनाच्या सूत्रांच्या माहितीनुसार न्हाईकडून दरवर्षी टोल दरवाढ होते. त्यानुसार न्हाईच्या निर्देशानुसार ही टोलवाढ करण्यात आलेली आहे. सदरची दरवाढ ही ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.आनेवाडी टोलनाक्यावरी १ एप्रिलपासूनचे नवीन दरपत्रकवाहन प्रकार एकेरी प्रवास दुहेरी प्रवासकार, जीप व हलकी वाहने ६० ९५एलसीव्ही (व्यावसायिक वाहने) १०० १५०बस व ट्रक २१० ३१५मल्टीएक्सेल वाहने (एचसीएम) ३३० ४९५