लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: महाविद्यालयीन तरूणीचा पाठलाग करून वाटेत थांबवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सुजल शीतल बारावडे (वय १९, रा. शनिवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित पीडित २० वर्षीय तरूणी स्कूटीवरून काॅलेजमधून घरी जात होती. दि. ५ रोजी दुपारी चार वाजता सुजल बारावडे याने तरूणीला वाटेत अडवले. ‘तू जर माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाहीस तर मी माझ्या जीवाचे बर वार्इट करून घेर्इन आणि तुझ्या घरच्यांना सांगेण की, तू माझ्यासोबत फिरतेस. यामुळे तुझे शिक्षण बंद करतील,’ यावर पीडित तरूणीने त्याला ‘माझी वाट सोडअन्यथा मी आरडाओरड करेन,’ अशी धमकी दिली. यानंतर तो तेथून पसार झाला. या प्रकारानंतर तरूणीने हा प्रकार घरातल्यांना सांगून सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक दळवी हे अधिक तपास करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"