शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

लाखो भाविकांच्या उपस्थितीत सिद्धनाथ रथोत्सव उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 7:51 PM

रथोत्सवामुळे म्हसवड नगरी गुलालमय झाली होती.

म्हसवड : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभल’च्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. रथोत्सवामुळे म्हसवड नगरी गुलालमय झाली होती.महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱ्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव उत्साहात पार पडला. उत्सवमूर्ती सालकरी महेश गुरव यांच्या घरून वाजत-गाजत रथामध्ये दुपारी अडीचच्या सुमारास बसवण्यात आल्या. यावेळी मानाच्या सासन काठ्यांची भेट झाल्यावर श्रींच्या मूर्तींची रथातून मिरवणूक काढण्यात आली. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून श्रीमंत अजितराव राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दीपसिंह राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, विश्वजित राजेमाने तसेच माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार विकास अहीर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या उपस्थितीत रथोत्सवास प्रारंभ झाला.अनेक भक्तांनी निशाने, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नगरप्रदक्षिणेसाठी निघाल्यानंतर उजवी प्रदक्षिणा घालून यावर्षी माण नदीपात्रात पाणी नसल्याने रथ पूर्वापार चालत आलेल्या मार्गाने म्हणजे माणगंगा नदी पात्रातून सातारा-पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिद्धनाथ यांच्या बहिणीस मानकऱ्यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला. याच ठिकाणी नवसाची मुले रथावरून खाली टाकण्यात आली व नवस फेडण्यात आले. त्यानंतर रथ वाघजाई ओढ्यातून पुढे कन्या विद्यालय श्री लक्ष्मीआई मरीआई मंदिर मार्गावरून रथाने नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.

प्रशासनाने भाविकांच्या वाहनांची पार्किंग शहरालगत केल्याने भाविकांना त्रास कमी झाला. तसेच नगरपरिषदेने पाण्याची सोय चांगल्या प्रकारे सोय केली होती. यात्रेत पाच लाखांहून अधिक भाविक आल्याने विविध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर झाल्याने व्यापारी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.चौकट

श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभरदिवाळी पाडव्याच्या दिवशी घटस्थापनेचे व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तुळशीविवाह दिवशी श्री सिद्धनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होऊन आज गुरुवारी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर