शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन लटकले..!

By admin | Published: July 31, 2015 9:26 PM

वडूज : गत वर्षापासून इमारत वापराविना; फर्निचरच्या वादाचे कारण?

वडूज : खटाव तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील तहसील कार्यालय परिसरातील सव्वाचार कोटी रुपये खर्च करुन बांधलेली प्रशासकीय इमारत उद्घटनाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या ही इमारत वापराविना पडून आहे. जुने की नवे फर्निचर वापरायचे, असा वाद यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. वडूज येथील या इमारतीत सुमारे सहा ते सात कार्यालये आपला कार्यभार सांभाळू शकतात. अशी ही प्रशस्त इमारत आजअखेर वापराविना पडून आहे. तहसील कार्यालयातील जुने फर्निचर त्याठिकाणी न्यावे की नवीन फर्निचर तयार करावे, या अंतर्गत वादात ही इमारत पडून आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत देखभाल असणाऱ्या या प्रशासकीय इमारतीच्या कामाला सुरुवात २ जानेवारी २०१२ रोजी झाली; परंतु गेल्या काही महिन्यांपूर्वीच रंगरंगोटी करून ही प्रशासकीय इमारत तयार करण्यात आली आहे. इमारतीच्या फर्निचरचा प्रश्न कायमपणे उभा आहे. कारण प्रथम १९ लाख नंतर ४७ लाख आणि सध्या ७८ लाखांवर खर्च पोहोचल्यामुळे या प्रस्तावाला मंत्रालयातून मंजुरी मिळेल का? हा यक्षप्रश्न लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पडला आहे. नवीन फर्निचरचा प्रस्ताव जिल्हा पातळीवर बरेच दिवस झाले अडकून पडला आहे. त्यामुळे ही इमारत सर्वसामान्यांसह कर्मचाऱ्यांना किती काळ वाट पाहायला लावणार आहे, याचीच चर्चा तालुक्यात सुरू आहे. तालुक्याचे राजकीयदृष्ट्या त्रिभाजन झाल्याने सर्वसामान्य जनतेसह राजकीय नेत्यांच्यात प्रचंड उदासीनता आहे. नागरिकांसाठी एकाच ठिकाणी सर्व कार्यालये असावीत, या हेतूने इमारत बांधण्यात आली. मात्र, लोकप्रतिनिधींची उदासीनता की अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी? या गर्तेत इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी) आगारासमोर बसस्थानक होणार? खटाव तालुक्यातील सर्वच महत्त्वपूर्ण शासकीय कार्यालये, दवाखाने, शाळा, कॉलेज, डेपो वडूज नगरीत आहेत. तालुक्यातून ये-जा करणाऱ्यांची वर्दळ प्रचंड प्रमाणात असून, सध्या असलेल्या बसस्थानकात वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वारंवार एस.टी. चालक व खासगी वाहतूक करणारे यांच्यात तंटे होत असतात. त्यामुळे प्रशस्त जागेत असणाऱ्या वडूज डेपोसमोर प्रशस्त जागा वापराविना पडून आहे. त्या ठिकाणी सुसज्ज बसस्थानकाचा प्रस्ताव ही जिल्हापातळीवर धूळखात पडला आहे.