वाई : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान, आण्णाभाऊ साठे, दलितेत्तर, चौदावा वित्त आयोग, नगरपालिका फंड व वैशिष्ट्यपूर्ण योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून वाई शहरांमधील प्रत्येक प्रभागामधील जनहितार्थ जवळपास १८ कोटी ५० लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते श्रीगणेशा करण्यात आला.
शहरातील रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण, नाल्यांचे बांधकाम व रिटेनिंग व्हॉल, आरसीसी बंदिस्त गटर बांधकाम, सांडपाणी व ड्रेनेज व्यवस्था शहरातील स्मशानभूमी नूतनीकरण, किवरा ओढा नवीन पुलाचे बांधकाम व फुले नगरमधील महात्मा फुले पुतळा चबुतरा अनावरण व लोकार्पण करण्यात आला. यामध्ये संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. वाई शहरातील प्रत्येक प्रभागात जवळपास १८ कोटी ५० लाख विकास कामांचा चढता आलेख ठेवताचा नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह नगरसेवकांनी आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला.
यावेळी मुख्याधिकारी किरण मोरे, नारायण गोसावी, सचिन धेंडे, निनाद जगताप, रमेश गायकवाड, भूषण गायकवाड, संजय लोळे, महादेव मस्कर, शशिकांत पवार, शशीदादा पिसाळ, लक्ष्मण पिसाळ, राजेंद्र सोनवणे, बापू जमदाडे, प्रमोद शिंदे, मामा देशमुख, संदीप डोंगरे, प्रदीप जायगुडे, सचिन गायकवाड, किरण काळोखे, गणेश भोसले, मंगलदास परदेशी उपस्थित होते.