सातारा : प्रजासत्ताकदिनी शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या साताऱ्यातील श्रीकृष्ण क्रीडा मंडळाने नूतन व्यायामशाळेची उभारणी केली आहे. या व्यायाम शाळेचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये मातीतील खेळाचे महत्त्व वाढवून तरुणांमध्ये कबड्डी व मैदानी खेळाची आवड निर्माण करणाऱ्या श्रीकृष्ण क्रीडा मंडळाची स्थापना १९२१ रोजी झाली. येत्या २६ जानेवारी रोजी हे मंडळ शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. शताब्दी वर्ष साजरे करणारे साताऱ्यातील किंबहुना क्रीडा क्षेत्रातील हे पहिलेच मंडळ असावे. या शताब्दी वर्षानिमित्त मंडळाने नूतन व्यायामशाळेची उभारणी केली असून, त्याचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे. या सोहळ्याला क्रीडाप्रेमी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.