शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

सातारा जिल्हा कारागृहातील बंदी आता एका क्लिकवर घेणार माहिती

By प्रगती पाटील | Published: February 26, 2024 3:28 PM

सातारा : सातारा जिल्हा कारागृहातील बंदींना त्यांची गुन्ह्यांबाबतची सर्वतोपरी माहिती मिळण्यासाठी ‘किऑस्क सिस्टीम’ कारागृहात कार्यान्वित करण्यात आली आहे. किऑस्क ...

सातारा : सातारा जिल्हा कारागृहातील बंदींना त्यांची गुन्ह्यांबाबतची सर्वतोपरी माहिती मिळण्यासाठी ‘किऑस्क सिस्टीम’ कारागृहात कार्यान्वित करण्यात आली आहे. किऑस्क सिस्टीमचे उद्घाटन सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश- १, कमला बोरा यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन करताना जिल्हा न्यायाधीश कमला बोरा म्हणाल्या, कारागृह प्रशासनाने बंदिंसाठी अशी यंत्रणा उभी करून खूपच चांगली सुविधा निर्माण करून दिली आहे. यामुळे बंदींना त्यांच्या बाबतच्या सर्वतोपरी माहिती त्यांना मिळण्यास मोलाची मदत होईल. कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे म्हणाले, ‘किऑस्क सिस्टीमद्वारे कारागृहातील सर्वच बंदी त्यांच्या गुन्ह्यांचे स्टेटस यामध्ये पाहू शकतात.त्याचबरोबर त्यांचे पैसे, नातेवाईक भेटी, वकील भेटी, गुन्ह्यांच्या तपशील इत्यादी सर्वच बाबी ते पाहू शकतात. त्यामुळे सदरची माहिती घेण्यासाठी कारागृहात यापूर्वी होत असलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जांची संख्या कमी होण्यास निश्चितपणे मदत होईल.’उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ जेलर राजेंद्र भापकर, वरिष्ठ लिपिक हेमंत यादव, लिपिक नानासो डोंगळे, शिपाई राकेश पवार, चेतन शहाणे, चांद पटेल, प्रभाकर माळी, प्रतीक्षा मोरे, रूपाली नलवडे, अंकिता करपे, तुषार जाधव, अमीर शेख आदी उपस्थित होते.

अशी आहे किऑस्क सिस्टीमया किऑस्क सिस्टीमद्वारे बंदींना ते कारागृहात कोणत्या गुन्ह्यात आले, त्यांना अटक केव्हा झाली, कारागृहात दाखल केव्हा झाले, त्यांच्यावर कोणत्या पोलीस स्टेशनचा गुन्हा आहे, कोणत्या पोलीस स्टेशनचे किती गुन्हे त्यांच्यावर आहेत, त्यांच्याजवळ त्यांच्या अकाउंटला खाजगी रक्कम किती आहे, किती खर्च झाला, न्यायालयाची मागील कोर्ट पेशीची तारीख काय होती तसेच न्यायालयाची पुढील कोर्ट पेशीची तारीख काय असेल याबाबतची सर्व माहिती या किऑस्क सिस्टीमद्वारे बंदींना मिळणार आहे.

किऑस्क सिस्टीमची माहिती ही प्रत्येक बंद्याला त्याच्या स्वतःचा ‘थम इम्प्रेशन’ देऊन स्वतः घेता येत असल्यामुळे त्याला आता न्यायालयीन प्रक्रिया संबंधी माहिती घेण्यासाठी कोणताही अर्ज किंवा माहिती अधिकाराचा अर्ज करण्याची आवश्यकता पडणार नाही. या सिस्टीम मुळे एका क्लिकवर सहज उपलब्ध होणार आहे. - शामकांत शेडगे, कारागृह अधिक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरjailतुरुंग