शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाची संततधार; कोयना धरण पाणीसाठ्यात झाली 'इतकी' वाढ

By नितीन काळेल | Published: June 30, 2023 12:20 PM

शेतकऱ्यांची पेरणी, लागणीची धांदल

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असून यामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. तर शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे ११० आणि महाबळेश्वरला १२८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणातही साठा वाढत असून १२ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.जिल्ह्यात सहा दिवसांपासून मान्सूनचा पाऊस सक्रीय झाला आहे. पूर्व भाग वगळता पश्चिमेकडे जोरदार पाऊस पडत आहे. चार दिवसांपासून तर संततधार आहे. कोयना, नवजा, तापोळा, बामणोलीसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे लोकांनाही घराबाहेर पडणे अवघड झालं आहे. त्याचबरोबर सूर्यदर्शनही झालेले नाही. संततधार पावसामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागलेत.परिणामी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत चालली आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात ११.९५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या पायथा वीजगृहातूनच १०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. हे पाणी कोयना नदीपात्रात जाते.शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४०४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजाला आतापर्यंत ५३९ आणि महाबळेश्वरला ७२३ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. त्याचबरोबर पश्चिम भागात धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पाऊस पडू लागलाय. यामुळे धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, पश्चिमेकडे पाऊस असल्याने शेतकऱ्यांची पेरणी, लागणीची धांदल सुरू आहे. मात्र, पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत अत्यल्प पेरणी झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान