सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे नवे ४१ रुग्ण आढळून आले आहेत, तर एका बाधिताचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात ५६ जण कोरोनातून मुक्त झाले.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. मात्र, नागरिकांकडून फारसी काळजी घेतली जात नसल्याचे पहायला मिळत आहे. आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु कोरोनाकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही. बाजारपेठेत, बसस्थानकात, मंडईमध्ये कोणीही मास्क लावत नाही. निर्धास्तपणे लोक फिरत आहेत.थंडीताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यास व्हायरल इन्फेक्शन आहे, असा समज करून घरच्या घरी लोक उपचार घेत आहेत. त्यातूनही कोरोना चाचणी केल्यास अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतरही लोक पूर्वीसारखे घाबरत नाहीत. या उलट रुग्णालयातून औषधे आणून घरीच उपचार घेत आहेत. कोणीही क्वाॅरंटाइन होत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या २१४ वर पोहोचली आहे, तर सहाजणांचा मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत कोरोनातून मुक्त होण्याचे प्रमाण जास्त असून, एका दिवसात ५०हून अधिक रुग्ण कोरोनातून मुक्त होत आहेत.
corona virus: सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, नवे ४१ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 6:19 PM