शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

आशादायक! सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी पातळीत वाढ, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 6:06 PM

जलसंधारणाची किमया दिसून आली

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होणे आणि पाणी उपसा वाढल्याने भूजल पातळीत घट होत चालली आहे. जानेवारीतील तपासणीतच पाटण आणि महाबळेश्वर या अतिवृष्टीच्या तालुक्यांतच पाणीपातळीत घट झाली आहे, तर दुसरीकडे आशादायक बाब म्हणजे माण, खटाव, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांतील पातळीत वाढ झाल्यामुळे जलसंधारणाची किमया दिसून आली आहे. तरीही पाणी उपशामुळे संकट ओढवू शकते.जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यात निश्चित केलेल्या विहिरींची पाणीपातळी मोजण्यात येते. त्यासाठी दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर महिन्यांत याची तपासणी होते. जिल्ह्यात एकूण निरीक्षण विहिरींची संख्या १०६ आहे. यावर्षीही जानेवारी महिन्यात या निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासण्यात आली. यामध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत एकूण ५० विहिरींच्या पाणीपातळीत घट झाल्याचे समोर आले. यामध्ये कऱ्हाड तालुक्यात ७, खंडाळा २, खटाव ४, कोरेगाव तालुका ४, माण ६, महाबळेश्वर तालुका २, पाटण ७, फलटण तालुका ८, सातारा ५ आणि वाई तालुक्यातील ५ निरीक्षण विहिरींत घट आढळली. यामध्ये जावळी तालुक्यात मात्र विहिरीत घट आढळून आलेली नाही.गेल्यावर्षीचा विचार करता यंदा भूजल पातळी आणखी खालावल्याचे दिसून आले. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यातील नोंदीनुसार फक्त ४१ विहिरींत घट आढळली होती. यामध्ये फलटण तालुक्यातील सर्वाधिक १० निरीक्षण विहिरींचा समावेश होता, तर यानंतर पाटण आणि खटाव, कऱ्हाड तालुक्यांचा समावेश होता. यंदा घट होणाऱ्या विहिरींची संख्या वाढली आहे.

खटावमध्ये सर्वांत वर पाणीजिल्ह्यात ११ तालुके आहेत. जानेवारीत तपासणी केल्यानंतर खटाव तालुक्यात भूजल पातळीत पाच वर्षांच्या तुलनेत ०.७३ मीटरने वाढ झाल्याचे दिसून आले. माण ताुलक्यात ०.५५ मीटरने वाढ आहे. तसेच वाईत ०.०६, कोरेगाव तालुका ०.३६, खंडाळ्यात ०.०६ मीटरने भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले.

कोणत्या तालुक्याची भूजल पातळी किती (मीटरमध्ये)तालुका -निरीक्षण विहिरी -जानेवारी पातळी - २०२२ मधीलजावळी - ०१ - ०.१० -  ०.१४कऱ्हाड -१५  - ०.०५ - ०.४२खंडाळा -०५ - ०.०६ - ०.२२खटाव -१७ - ०.७३ -  १.०२कोरेगाव - ०९ - ०.३६  -०.७०माण -१६ - ०.५५ - ०.५८महाबळेश्वर -०३ - ०.२३ - ०.१२पाटण - १० - ०.५७ - ०.०७फलटण - १२ - ०.०४ - ०.८५सातारा - १० - ०.०३ - ०.५५वाई  - ०८ - ०.०६  - ०.९६वाढ दिसते, पण तुलनेत पातळी कमी

जिल्ह्यातील माण, खटावसह काही तालुक्यांत पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीत वाढ दिसून येत आहे. ही वाढ वाॅटर कपमधील कामे तसेच जलसंधारणामुळे झालेली आहेत. मात्र, पिके आणि फळबागांसाठी आज मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे. यामुळे पाणीपातळी वाढत असल्याचे दिसले तरी त्यामध्ये हळूहळू उतार येत चालला आहे. हे मागील तीन वर्षांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीची तपासणी जानेवारी महिन्यात करण्यात आली. यामध्ये ५० विहिरींत घट, तर ५६ मध्ये वाढ दिसली. तसेच तालुक्यांच्या विचार करता पाटण आणि महाबळेश्वरमध्ये घट आहे. सरासरी पर्जन्यमान कमी असल्याने या दोन तालुक्यांत अशी परिस्थिती असू शकते. - डब्लू. जे. बनसोडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी