शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सांगलीतून पाण्याची मागणी वाढली; कोयनेतून विसर्ग वाढवला

By नितीन काळेल | Updated: February 21, 2024 12:50 IST

राज्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या पाणी प्रकल्पातही कमी साठा उरला

सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी आणखी मागणी वाढल्याने कोयना धरणाच्या आपत्कालिन द्वारमधून बुधवारी सकाळपासून १ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आता सांगलीसाठी पायथा वीजगृह २१०० आणि द्वार असे मिळून ३१०० क्यूसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.राज्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या पाणी प्रकल्पातही कमी साठा उरला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागणार आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातही पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात सुरु झालेले टॅंकर अजून बंद झाले नाहीत. त्यातच सध्यातर सहा तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर एक लाखाहून अधिक नागरिक आणि हजारो पशुधनाची तहान अवलंबून आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठे पाणी प्रकल्प आहेत.गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाल्याने ही धरणे भरली नाहीत. त्यातच या धरणावर अनेक सिंचन आणि पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे टंचाई आणि सिंचनाची मागणीमुळे धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. आताही कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी विसर्ग सुरूच आहे.

गेल्यावर्षी कोयना धरण परिसरातही कमी पाऊस झाला होता. त्यामुळे कोयना ९५ टीएमसीपर्यंतच पोहोचलेले. भरण्यासाठी १० टीएमसी पाणीसाठा कमी पडलेला. या कोयनेच्या पाण्यावरच वीजनिर्मिती तसेच अनेक सिंचन आणि पाणी योजना अवलंबून आहेत. त्यातच साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात कमी पाऊस पडला होता. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी मागणी होत होती. त्याप्रमाणे कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात येत आहे. आता हा विसर्ग आणखी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सांगलीसाठी आता ३१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.

आपत्कालिन द्वारमधून १ हजार क्यूसेकपर्यंतच विसर्ग..सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यातच मंगळवारी सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने आपत्कालिक द्वारमधून ५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पुन्हा मागणी वाढली. परिणामी बुधवारी आणखी आपत्कालिन द्वारमधून ५०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या द्वारमधून जास्तीतजास्त एक हजार क्यूसेकपर्यंतच विसर्ग करता येतो, अशी माहिती देण्यात आली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी