वडूज : ‘आगामी काळात होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या माध्यमातून खटाव-माण तालुक्यांत शिवसेनेची ताकद वाढवा,’ असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले.निमसोड, ता. खटाव येथे हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुुख नंदकुमार घाडगे, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, वसंतराव गोसावी, सुरेशशेठ शिंदे, रणधीर जाधव, गोविंदराव शिंदे, संभाजी फडतरे, राजूभाई मुलाणी, डॉ. संतोष गोडसे, विकास जाधव, शाहिस्तेखान मुलाणी, मनोहर लावंड, सी. बी. पवार, रामभाऊ घार्गे, गुलाबराव वाघ, वसंतराव गोसावी, संजयशेठ शितोळे, संभाजी पाटील, सी. के. आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवतारे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत खटाव तालुक्यात शिवसेनेची चांगली ताकद दिसून आली. विधानसभेप्रमाणेच बाजार समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सर्व प्रमुख कार्यकर्ते एकदिलाने सामोरे गेले तर या ठिकाणी निश्चितपणे परिवर्तन होणार आहे. माणमध्ये संघटनेची बांधणी करण्यासाठी लक्ष घालावे लागणार आहे. दोन्ही तालुक्यांतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रणजितसिंह देशमुख यांचे नेतृत्व चांगले आहे. यापुढच्या काळातही त्यांच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी शिवसेना व शासनाच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल. दोन्ही तालुक्यांतील शिवसैनिकांनी जुना-नवा, असा भेदभाव न ठेवता देशमुखांच्या नेतृत्वाखाली संघटनेची चांगली बांधणी करावी.’रणजितसिंह देशमुुख यांनी दोन्ही तालुक्यांतील विकासकामे व वैयक्तिक अडीअडचणीबाबत पालकमंत्र्यांना निवेदन दिले.या बैठकीस धर्मराज जगदाळे, लक्ष्मण शिंगाडे, मुबारक मुल्ला, विजय शिंदे, शहाजी देशमुख, किसनराव सानप, विकास साबळे, अंकुशराव घाडगे, परेश जाधव, प्राचार्य आर. एन. घाडगे, शिवाजीराव देशमुख, अॅड. सुभाषराव देशमुख, अॅड. अजित घाडगे, हिम्मत जगदाळे, सुनील फडतरे, दादासाहेब कदम-पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शिवसेनेची ताकद वाढवा: शिवतारे
By admin | Published: July 10, 2015 10:15 PM