शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप: सामुहिक रजा अन् पाठिंबा; सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कामे ठप्प 

By नितीन काळेल | Published: December 14, 2023 2:16 PM

सातारा : जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन-चारच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. ...

सातारा : जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन-चारच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. याला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शासकीय कामे ठप्प झाली. तर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी सामुहिक रजा टाकून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, संपात २० हजारांवर कर्मचारी सहभागी झाल्याचा अंदाज आहे.याबाबत माहिती अशी की, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी अनेक वर्षांपासून आहे. तरीही शासनाकडून डोळेझाक होत आहे. यासाठी गुरुवारपासून राज्यभरात बेमुदत संप सुरू करण्यात आला आहे.त्याचबरोबर या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांही करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, रिक्त पदे भरली जावीत, विनाअट अनुकंपा नियुक्ती करणे, कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटीकरण करणे, चतुऱ्थश्रेणी कर्मचारी आणि वाहनचालक पद भरतीवरील बंदी उठविणे. शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना, समुह शाळा योजनांद्वारे शाळांचे होणारे कार्पोरेट धार्जिणे खासगीकरण धोरण रद्द करणे, नवीन शिक्षण धाेरणाचा पुनर्विचार करणे, पाचव्या वेतन आयोगापासून वेतनत्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांसाठी हा संप करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातीलही शासकीय, निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. तसेच शिक्षकांचाही या संपात समावेश आहे. सुमारे २० हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी आहेत. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. कामासाठी आलेल्या नागरिकांना माघारी जावे लागले आहे.

मार्चमध्ये ७ दिवसांचा संप..कर्मचाऱ्यांनी मार्च महिन्यात विविध मागण्यांसाठी संप केला होता. हा संप ७ दिवस चालला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर आश्वासनामुळे संप मागे घेतला. त्यातील ग्रॅच्युईटी आणि कुटुंब निवृत्त वेतन या दोन मागण्या मान्य झाल्या. जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्यांबाबत काहीच झाले नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलन सुरू केले आहे.

जिल्हा परिषदेत शुकशुकाट..जिल्हा परिषदेतील बहुतांशी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अधिकाऱ्यांनीही सामुहिक रजा टाकली आहे. तर काही संघटनांनी संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काही कार्यालयात एखादा-दुसरा कर्मचारी काम करताना दिसून आला. तरीही दिवसभर जिल्हा परिषदेत शुकशुकाट दिसून आला. बहुतांशी कार्यालयांना टाळा लावला होता. तसेच संपाची माहिती असल्याने नागरिकही कमी प्रमाणात दिसून आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातही संपाचा फिव्हर..जिल्हाधिकारी कार्यालयातही संपाचा फिव्हर दिसून आला. वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर विविध मागण्यांचे निवेदन घेऊन येताना काही नागरिक दिसून आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPensionनिवृत्ती वेतनGovernmentसरकारStrikeसंप