मलकापूर : मलकापुरात भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातील संस्था व शाळांमधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. मलकापूर नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासह शहरातील २२ अंगणवाड्या, ११ जिल्हा परिषद शाळा व विविध संस्थांमध्ये व माध्यमिक शाळांमधून साध्या पध्दतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. तर काही ठराविक शाळांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उपस्थितीची सोय केली होती.
येथील पालिकेच्या मुख्य कार्यालयात नगराध्यक्ष नीलम येडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, पंडित पाटील, राजेंद्र यादव, आनंदी शिंदे, गितांजली पाटील, प्रशांत चांदे, अजित थोरात, सागर जाधव, दिनेश रैनाक, आबासाहेब सोळवंडे, नुरजहांन मुल्ला, कमल कुराडे, आनंदराव सुतार, नंदा भोसले, अलका जगदाळे, शकुंतला शिंगण, पूजा चव्हाण, स्वाती तुपे, माधुरी पवार, निर्मला काशिद उपस्थित होते.
येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेज येथे अभय पाडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, पी. जी. पाटील, विलासराव पाटील, डॉ. सी. व्ही. महाजन, प्राचार्य एस. वाय. गाडे, कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख शीला पाटील, प्रदीप सुंदेशा, नानासाहेब तुपे, रामचंद्र शिंदे, जयवंत पडवळ, राहुल मासाळ, अधिकराव घाडगे, बी. बी. पाटील, अल्ताफ मुजावर, शेखर शिर्के, एस. बी. पाटील, ए. के. पाटील, जगन्नाथ जाधव, विजय मुठेकर, भीमराव माऊर, पर्यवेक्षिका ए. एस. कुंभार उपस्थित होते. सुरेखा खंडागळे, सविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य एस. वाय. गाडे यांनी प्रास्तविक केले. उपमुख्याध्यापक एस. बी. शिर्के यांनी आभार मानले.
येथील प्रेमलाताई चव्हाण कन्याशाळेत डॉ. करिश्मा मोमीन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उद्योजक वाहिद मोमीन, अध्यक्ष वासिम मुल्ला, सचिव अशोकराव थोरात, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, मुख्याध्यापिका सुलोचना भिसे, पर्यवेक्षक सुरेश राजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री पाटील, जयवंत पाटील यांनी केले.
रोटरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. कोयना वसाहत येथील बचपन प्ले हाऊस व अकँडमिक हाईट्समध्ये स्वातंत्र्यदिन साध्या पध्दतीनेच साजरा करण्यात आला. यावेळी संचालक सी. बी. जाधव, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हौसाई कन्याशाळा, शास्त्रीनगर, आगाशिवनगर येथील लक्ष्मीदेवी शिक्षण मंडळाचे नूतन मराठी विद्यालय, आदर्श प्राथमिक विद्यालय, मलकापूर व आदर्श प्राथमिक शाळा, आगाशिवनगर यांच्यासह शहरातील विविध सहकारी संस्था, २२ अंगणवाड्या, जिल्हा परिषदेच्या सर्व ११ शाळांमधून स्वातंत्र्यदिन साध्या पध्दतीनेच साजरा करण्यात आला.