कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना बाधित मुलांचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत तब्बल तीन हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, शहरात बाधित मुलांसाठी कोठेही स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था नाही. तसेच स्वतंत्र कोरोना सेंटरही नाही. ही परिस्थिती ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे मांडल्यानंतर पालिकेने याची गंभीर दखल घेत शंभर बेडचे स्वतंत्र कोरोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्याधिकारी निवासमध्ये वीस ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली आहे. मार्केट यार्डातील तहसील कार्यालयाच्या पालिकेच्या जुन्या इमारतीत ८० बेडचे स्वतंत्र लहान मुलांचे कोरोना सेंटर उभारले जाणार आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह हेसुद्धा या कोरोना सेंटरची पाहणी करणार असून, त्यांच्या पाहणीनंतर सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्याधिकारी निवास इमारतीसह त्याच्यासमोरील इमारतीतही ऑक्सिजनच्या वीस बेडची व्यवस्था पालिका करणार आहे.