फलटण : केंद्र सरकारने केलेल्या काळ्या कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढून फलटण शंभर यशस्वी केला. तर तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.
शुक्रवार, दि. २६ मार्च रोजी किसान मोर्चाने पुकारलेल्या ‘भारत बंद’ बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला होता.
फलटण शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिक छोटे-मोठे व्यापारी, भाजी मंडईवाले यांनी बंदमध्ये सहभाग नोंदवून शंभर टक्के बंद यशस्वी केला.
रॅलीमध्ये संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे नाईक-निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, भीमदेव बुरुंगले, नगरसेवक अजय माळवे, दादासाहेब चोरमले, किशोरसिंह नाईक-निंबाळकर, बाळासाहेब मेटकरी, सुधीर अहिवळे, सनी अहिवळे, राहुल निंबाळकर, अनिल शिरतोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस सर्व सेलचे पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी वेळेत उपस्थित होते. दिल्ली येथील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील गोखळी पाटी, बडेखान, तरडगाव, सुरवडी, आळजापूर, राजुरी आदी ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.