कोपर्डे हवेली (जि. सातारा) : गत पंधरा दिवसापासून ऊस पिकासह इतर पिकावर हुमणी किडीचा पादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदील झाले असुन त्याचा नायनाट करण्यासाठी वेगवेगळ्या औषधाच्या फवारण्या करीत आहेत.
गत पंधरा दिवसापासुन बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकावर होताना दिसून येत आहे. सध्या पिकावर किडीचा पादुर्भाव झाला आहे. कधी ढगाळ वातावरण तर कधी ऊन पडत असल्याने किड निर्माण होत असुन पिकाचे नुकसान होत आहे.
हुमणी किड जमिनीत तयार होते. हुमणी नावाचा किडा निर्माण होवुन पिकाचे मुळे खात आहे. त्यामुळे पिक वाळत आहे. जमीनीतच हुमणी किड्याचे वास्तव्य असल्याने पिक वाळुन गेल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव लक्षात येत आहे.
ऊस, भुईमूग, सोयाबीन आदिसह इतर पिकावर सध्या किडीचा पादुर्भाव झाला आहे. आडसाली ऊसाच्या मुळ्या हुमणी किडा खात आहे. त्यामुळे ऊस वाळत आहे. तोच प्रकार भुईमूग, सोयाबीनच्या बाबतीत घडत आहे. किडीचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक औषधाचे आळवणी पिकाच्या बुंध्याला घातले जात आहे.
प्रतिकूल वातावरणाचा परिणाम पिकांवर झाला असुन किड लवकर आटोक्यात आली नाही तर उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. संबंधित विभागाने किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.आडसाली ऊसाला हुमणी किडीचा पादुर्भाव झाला आहे. त्याचा परिणाम ऊस वाळण्यात होत आहे. हुमणी जमिनीत असल्याने ऊसाची मुळे खात आहे. औषधांचाही उपयोग होत नाही.- बापुराव पवार,शेतकरी, वडोली निळेश्वर