कºहाड (जि. सातारा) : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने त्याची जय्यत तयारी सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. विशेषत: मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून तयारीला वेग आला आहे. यंदा जीएसटीमुळे गणेशमूर्तींच्या किंमती काही प्रमाणात वधारल्या आहेत. मात्र, उत्सवासाठी लागणाºया सजावट साहित्यासह अनेक गोष्टींवर याचा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट असल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सव म्हणजे सर्वात मोठा उत्सव. अबालवृद्धांपासून सर्वांना हव्याहव्याशा वाटणाºया बाप्पांच्या आगमनासाठी सर्वजण आतुर असतात. बाप्पांच्या स्वागताची तयारीही मोठ्या उत्साहात केली जाते. उत्सवातील खर्चाला पारावार उरत नाही. अशा या उत्साहाला यावर्षी काही प्रमाणात महागाईची झळ पोहचत आहे. जीएसटीचा फटका कमी-अधिक प्रमाणात सर्वांनाच सहन करावा लागत आहे. त्यात यावर्षी जीएसटीमुळे गणेशमूर्तींच्या किंमतीही वीस ते पंचवीस टक्यांनी महागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात सजावट साहित्याचीही भर पडली आहे. सजावट साहित्यात यावर्षी १५ ते २० टक्के दरवाढ झाली आहे. त्यामुळे सजावट साहित्याच्या मार्केटमधील २५ टक्के व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे.
वाहतूक खर्च, मंडप उभारणी साहित्यांसह अन्य सजावट साहित्य, पडद्यांच्या किंमती वाढल्याने मंडप डेकोरेशनच्या दरातही यंदा दहा ते पंधरा टक्के दरवाढ झाली आहे. मंडप डेकोरेशन व्यवसायाला जीएसटीचा फटका बसणार नसला तरी महागाईचा परिणाम मात्र जाणवत आहे. गणेशोत्सव, दुर्गाउत्सव या कालावधीत सार्वजनिक मंडळांकडून सजावटीसाठी अमाप खर्च केला जातो.
सजावटीसाठी अगदी विद्युत रोषणाईपासून फुलांपर्यंत अनेक गोष्टी वापरल्या जातात. या सर्व वस्तूंच्या दरात दरवर्षी किमान पाच ते दहा टक्के वाढही झालेली पहायला मिळते. यामुळे नकळत त्याचा भुर्दंड मंडप डेकोरेटर्सना सोसावा लागतो. शिवाय मागणीनुसार नवनवीन वस्तू सजावटीसाठी मागवाव्या लागतात. याचा खर्चही सोसावा लागत असल्याने प्रतीवर्षी मंडप डेकोरेशनमध्ये १० टक्के वाढ होत असते.
सजावट साहित्य खरेदीसाठी २८ टक्के जीएसटी भरावा लागत आहे. त्यामुळे दरवाढ अटळ आहे. जवळपास सर्वच व्यापाºयांमध्ये जीएसटी आकारणीबाबत आजही संभ्रम आहे. सध्या बाजारात यामुळे मागणीनुसार साहित्य उपलब्ध होऊ शकलेले नाही. उत्सवांच्या सुरुवातीला हे चित्र आहे; पण पुढे जवळपास चार महिने सजावट साहित्य विक्रीचा हंगाम सुरू होत आहे.