सूर्यकांत निंबाळकर - आदर्की-फलटण पश्चिम भागात विविध विकास निधीतून कामे करताना कामाच्या माहितीचे फलक लागले आहेत. परंतु सिमेंट बंधाऱ्याची कोट्यवधींची कामे पूर्ण होऊनही एकाही सिमेंट बंधाऱ्यावर माहितीचा फलक लावला नसल्याने सर्वसामान्यांना अंधारात ठेवल्याची चर्चा आहे.फलटण पश्चिम भागात हिंगणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात मुख्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर विकास निधीतून होणारी दलित वस्ती रस्ता, व्यायाम शाळा, सामाजिक सभागृह, स्मशानभूमी सुशोभीकरण, अंगणवाडी इमारत आदी विकासकामांचे फलक गावागावात झळकत आहेत. अगदी १ लाख ते १२ लाखांपर्यंत फलक आहेत. सिमेंट बंधारे दुरुस्ती ४ लाखांने १२ लाखांपर्यंत खर्च येतो. मात्र, माहितीचा फलक लावला जात नाही. म्हणजे सर्व जनतेला अंधारात ठेवत असल्याचा आरोप होत आहे. सिमेंट बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले. निविदाप्रक्रिया काय असते, हे समजत नाही. अधिकारी वर्गच परप्रांतीय टोळ्या आणून स्वत:च कामे करून घेत असल्याचे समजते. कामाच्या माहितीचा फलक नसल्यामुळे ठेकेदार, मजूर संख्या, निविदाप्रक्रिया, कामाची रक्कम, काम सुरू, काम पूर्ण बंधाऱ्यात पाणी क्षमता किती काही लोकांना समजत नाही.
बंधाऱ्यांवरील माहितीचा फलकच झालाय गायब
By admin | Published: July 08, 2015 10:12 PM