कार्वे येथील डोंगर उतारावर १९७२-७३ या वर्षात वाघजाई तलाव बांधण्यात आला. तलावाची एकूण लांबी तीनशे मीटर आहे. ५.६५ एमसीएफटी इतकी पाणी साठवण क्षमता असून, जिल्हा वार्षिक नियोजनमधून जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडून दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे. २८ लाख ३ हजार रुपये एवढ्या अंदाजपत्रकीय खर्चातून तलावातील झाडेझुडपे काढणे व बांध साफ करणे, मुरूम भराव करणे, माती भरावावर कवच भरावा करणे, माथा पातळी रुंदावण्यासाठी माती भराव तसेच कवच भराव करणे, गळती काढणे, कवच भरावावर पिचिंग करणे तसेच सांडवा बांधकाम यासह फ्लॅक व्हॉल दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.
या कामाचा प्रारंभ उपअभियंता जे. जे. थोरात, कनिष्ठ अभियंता यू. यू. सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माणिकराव थोरात, वसंत हुलवान, राजेंद्र सावंत, विठ्ठल हुलवान, सागर देसाई, सदाशिव सावंत, रामचंद्र बोंद्रे, अंकुश सूर्यवंशी, अनिल, खवळे, बबन रसाळ, पोपट पवार, सूरज हुलवान, सागर जगताप उपस्थित होते.