सातारा : आनेवाडी टोलनाका हस्तांतरणावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह ११ जणांची वाई न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.
याबाबत अधिक माहिती अशी, खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आनेवाडी टोलनाका हस्तांतरणावरून तीन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष झाला होता. यानंतर दोन्ही राजे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये सुरुची राडा झाला होता. आनेवाडी टोलनाक्यावर जमावबंदीचे आदेश असतानाही उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकानी जमाव केल्याने वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला झाला होता. या प्रकरणाची सुनावणी वाई न्यायालयात सुरू होती. त्यानुसार उदयनराजे आणि समर्थक वाई कोर्टात हजर झाले होते. गेल्या आठवड्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. दरम्यान, शुक्रवारी खासदार उदयनराजे यांच्यासह ११ जणांची वाई न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.