लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एकही अभिनेता नसलेला अवघ्या दोन मिनिटांचा ‘इनोसंट व्हेव’ या लघुपटाने कमालच केली. हा लघुपट गोवा लघुपट महोत्सवात अव्वल ठरला. या लघुपटाचे दिग्दर्शन साताºयातील धैर्यशील उत्तेकर यांनी केले आहे. यामुळे त्यांच्या दिग्दर्शनात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
आधुनिक काळात एखादी छोटी घटना तुमच्यावर किती परिणाम करू शकते? हे हा लघुपट पाहिल्यावर कळतं. २०१५ मध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी सीरियामध्ये धुमाकूळ घातला होता. त्या दहशतीची भीती सीरियन नागरिकांमध्ये इतकी पसरली की त्यांनी देश सोडून पळून जाणे पसंत केले. कित्येक सीरियन कुटुंब देश सोडून पळून गेले.आयलान कुर्दी या तीन वर्षीय सीरियन मुलाचं कुटुंबही इसिसच्या दहशतीला कंटाळून समुद्र मार्गाने कॅनडाच्या आश्रयाला पळून जात असताना त्यांच्या बोटीला अपघात होतो. त्यात आयलान कुर्दी हा त्याची आई आणि भाऊ यांचा मृत्यू झाला. खरंतर असे खूप अपघात झाले आणि खूप मृत्यूही झाले.
या अपघातानंतर आयलानचा मृतदेह ज्या किनाºयावर आला तेव्हा तिथे त्या इटुकल्या निष्प्राण जीवाचे जे फोटो नंतर जगभरातल्या माध्यमांनी प्रसारित केले ते इतके गोड होते की जणू एक निरागस बालक शांत झोपलंय असं ते दृश्य होतं. या फोटोंनी जगाचं हृदय हेलावून गेलं.
साताºयातील धैर्यशील उत्तेकर हे त्यापैकीच एक होते. ह्या छायाचित्राचा आणि त्या गोष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की त्यांना ही गोष्ट कॅमेºयात कैद करावीशी वाटली.त्यासाठी त्यांनी फक्त चित्राची भाषा या लघुपटात वापरली आहे. समुद्र, पक्षी, मुंगळे, लाटा, फटाका आणि लहान मुलाचे खूप बोलके डोळे असणारे बूट यांचा वापर करून एक खूप बोलका लघुपट ‘इनोसंट व्हेव’च्या माध्यमातून आपल्यासमोर येतो.
लघुपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन धैर्यशील उत्तेकर यांचे असून, चित्रीकरण केतन मोहिते तसेच संकलन विश्वजित सातपुते आणि संगीत संतोष भंडारे यांनी केले आहे. निर्मितीची जबाबदारी आशा हणमंत उत्तेकर यांनी संभाळली. निर्मितीसाठी अभिषेक परदेशी, मोहसीन भालदार आणि विनायक बगाडे यांनी सहकार्य केले.यशाबद्दल वेदांतिकाराजे भोसले, प्रमोद कोपर्डे, किशोर बेडकिहाळ, तुषार भद्रे, रवींद्र डांगे, बाळकृष्ण शिंदे, प्रसाद नारकर, राजीव मुळे, चंद्र्रकांत कांबिरे, जमीर आतर, राजेश मोरे, प्रसाद देवळेकर यांनी कौतुक केले.मनामनात दहशतवादाचा निषेधलघुपटाची तीव्रता इतकी आहे की पाहणारा पुढे कित्येक वेळ अबोल होऊन जातो आणि त्याच्या मनातही दहशतवादाचा तीव्र निषेध निर्माण होतो. जागतिक दहशतवादाचा इतका अबोल. बोलका निषेध पाहायला मिळणं हा विरळाच योग.