सातारा : नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्या की खासदार उदयनराजेंना इनोव्हेटिव्ह साताराचे स्वप्न पडते. नगरपालिका निवडणूक संपली की इनोव्हेटिव्ह सातारा ही योजना बंद पडेल, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी केली आहे.सुरुची बंगलो येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, सातारा पालिकेच्या निवडणूक जवळ आल्या की वातावरण निर्मितीसाठी खासदार उदयनराजे भोसले नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना विकासाची खोटी स्वप्न दाखवतात.त्यामुळे सातारकरांना त्यांच्या त्यांच्या खोटेपणाची जाणीव झाल्याने त्यांना सातारा विकास आघाडीचा पराभव दिसू लागला आहे. यामुळे खासदार सध्या कोट्यवधींच्या विकासकामांची खोटी स्वप्ने दाखवत आहेत. ते अब्जावधीची कामे केली असेही काही दिवसांनी सांगतील. मात्र हा देखील विकास नुसता कागदावरच पाहायला मिळणार आहे.शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले की, सातारच्या जनतेने पाच वर्षे संधी देऊनही सातारा विकास आघाडीला कामे करता आलेली नाहीत. आता त्यांना पराभव समोर दिसत असल्याने वातावरण निर्मिती केली जात आहे. जनतेने त्यांच्या आमिषाला बळी पडून नये. शाश्वत विकास जे करतील, त्यांच्याच पाठिशी जनतेने राहावे. निवडणूक संपली की इनोव्हेटिव्ह सातारा या योजनेची मुदत ४ ते ६ महिन्यांत संपेल, हे देखील जनतेने लक्षात घ्यावे.सातारा विकास आघाडीवर गंभीर आरोपसातारा विकास आघाडीच्या ताब्यात सातारा नगरपालिकेचा कारभार आहे. सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचारच कुरण झालेली आहे. तिथं नुसत चरायचं आणि आपले खिसे भरायचे एवढंच सुरु आहे, असा गंभीर आरोपही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंवर केला आहे.
इनोव्हेटिव्ह सातारा योजना निवडणुकीपुरतीच!, उदयनराजे खोटी स्वप्न दाखवतात; शिवेंद्रसिंहराजेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 1:51 PM