कराड : मलकापूर ( ता. कराड ) येथील यशवंतराव मोहिते इन्स्टिट्युट ऑफ मॅनेंजमेन्टमध्ये विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. समाजाला नवीन दिशा देण्याचे काम येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले आहे.
भारती विद्यापीठाच्या मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेल्या स्वयंसेवकांनी ट्रे मध्ये झाडे लावून ट्रे गार्डनिंग हा नवीन उपक्रम राबविला आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ तसेच ‘टाकाऊपासून टिकाऊ’ याचे महत्त्व लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनामधील स्वयंसेवकांनी हा उपक्रम हाती घेतला.
जुने ट्रे शोधून, जे लोकांनी टाकून दिले होते त्याला स्वच्छ करून व त्याला शोभेल असे रंगकाम करून भरपूर प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत. यावेळी भारती विद्यापीठ यशवंतराव मोहिते इन्स्टीट्युट ऑफ मॅनेंजमेन्ट कराडचे संचालक डॉ. राजेश कंठे यांनी मार्गदर्शन केले.
फोटो