शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

काळाचा घाला; पण माणुसकीचा ओलावा !

By admin | Published: May 29, 2015 10:04 PM

नांदलापूरच्या अपघातात मदतीचा ओघ : कुणी दवाखान्यात तर कुणी निघालेलं लग्नाला; सेवानिवृत्तीच्या आदल्या दिवशी सचिवाचा अंत

मलकापूर : सकाळी उठलं की प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात एका नवीन स्वप्नाने होते. अशाच नियोजनानुसार विविध कामांसाठी शुक्रवारी वडापमधून कऱ्हाडकडे निघालेल्या प्रवाशांवर काळाने झडप घातली. दोन बसमधील चालकांच्या वेगाच्या स्पर्धेमुळे ही दुर्घटना घडली. अ‍ॅपे रिक्षात बसलेल्या चार प्रवाशांना जीव गमवावा लागला तर आठजण गंभीर जखमी झाले. काळाचा घाला पडला पण आजुबाजूच्या लोकांनी माणुसकीचा ओलावा दाखवत तत्काळ मदत केली.नेहमी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची प्रवासी खेचून आणण्याची स्पर्धाच सुरू असते. लवकर उठून इतरांपेक्षा एक ट्रिप जास्त मारण्यासाठी सर्वच वडाप चालकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार शुक्रवारी बेलवडे येथील मोहन मोहिते यानेही चांदोली मार्गावर आपला व्यवसाय सुरू केला. येळगाव येथून येळगावसह गोटेवाडी, भुरभूशी, घोगाव अशा विविध थांब्यांवरून त्याने आपल्या रिक्षात प्रवासी घेतले. गोटेवाडीचे काटेकर कुटुंबीय शामगाव येथे मुलीला घेवून पुढे गिरजावडे येथे लग्न समारंभासाठी जाणार होते. भुरभूूशी येथील पाटील कुटूंबीय १२ दिवसांच्या चिमुकलीसह तिच्या आईला दवाखान्यात दाखविण्यासाठी निघाले होते. तर सर्जेराव पाटील हे वारूंजी येथे आपल्याच सेवानिवृत्ती निमित्त आयोजित निरोप समारंभाच्या तयारीसाठी निघाले होते. या कुटुंबियांसह इतर प्रवासी आपापल्या कामानिमित्त संबंधित रिक्षातून कऱ्हाडला निघाले होते. तर काही प्रवासी मुंबईला जाण्यासाठी कऱ्हाडला निघाले होते. आपला अपघात होईल, याची कसलीच कल्पना घरातून निघताना कोणाच्याही डोक्यात नव्हती. मात्र, अचानक महामार्गावर वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या दोन आरामबसपैकी एका बसने अ‍ॅपे रिक्षाला धडक दिली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. या अपघातात एका महिलेसह तिघांना आपला जीव गमवावा लागला. बाळ व पत्नीला घेवून दवाखान्यात जाणाऱ्या बाबुराव पाटील यांनाही जिव गमवावा लागला. तर नोकरीच्या ठिकाणी निरोप समारंभाच्या तयारीसाठी निघालेल्या सर्जेराव पाटील यांना आपल्या आयुष्याचाच निरोप घ्यावा लागला. नातेवाईकांकडे निघालेल्या आनंदीबाईही अपघातात ठार झाल्या. या अपघातात तिन्ही कुटूंबांवर काळाने घाला घातल्याने येळगाव, गोटेवाडी व भुरभूशी गावांवर शोककळा पसरली आहे.(प्रतिनिधी) जखमी महामार्गावर फेकले नांदलापूर येथील अपघातात बसची अ‍ॅपेरिक्षाला एवढी जोरदार धडक बसली की, चालक वगळता रिक्षातील बारा दिवसांच्या बाळासह सर्व प्रवासी महामार्गावर फेकले गेले. घटनास्थळी आरडा ओरडा आणि वाचवा-वाचवा असा एकचं गोंधळ उडाला. बारा दिवसांचे बाळ मातेच्या कुशीत अपघातात दवाखान्यात निघालेल्या पाटील कुटुंबावर काळाने घाला घातला. बाबुराव पाटील रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले तर स्वाती या आपल्या बारा दिवसांच्या बाळाला कुशीत घेवून बेशुध्द अवस्थेत होत्या त्या बाळाला महिलांनी कुशीतून काढून तातडीने दवाखान्यात नेले. ५अज्ञात पोलिसाची सतर्कता अपघात घडला त्यावेळी नेमका स्वत:च्या चारचाकी वाहनातून कोल्हापूरकडे जात असलेल्या (नाव समजले नाही) एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत गाडीतील नातेवाईकांसह स्वत:ही मदत कार्य केले. कोणीही जखमींना उचलण्यासाठी पुढे येत नसताना त्याने स्वत:चे कपडे रक्ताने भरले. तरी त्याची फिकीर केली नाही.