कऱ्हाड : पाटण तालुक्यातील केरा विभागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित गावांचा पाहणी दौरा राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील यांनी केला. यावेळी ठिकठिकाणी झालेल्या नुकसानाची ग्रामस्थांकडून त्यांनी माहिती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यावेळी उपस्थित होते. पिंपळोशी, बोंद्री, चिटेघर, आंबवणे, दिवशी खुर्द, खिवशी, चाफोली येथील नुकसानाची सारंग पाटील यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
मालदनच्या विद्यालयाला सांगलीच्या संस्थेची मदत
कऱ्हाड : महापुरात मोठे नुकसान झालेल्या मालदन (ता. पाटण) येथील छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलला सांगलीच्या स्वस्वरूप शोधक साधक संस्था व राधाकृष्ण मंदिरामार्फत शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात आली. पुस्तके, वह्या, फळा, डस्टर, मार्कर पेन अशा स्वरुपात संस्थेने दिलेल्या मदतीचे वाटप सचिन काळे, शिवाजी काळे, विक्रम सपकाळ, रमेश चव्हाण, प्रवीण इंगळे, हेमंत खैरमोडे, प्रतीक सुतार, अभिजीत जाधव आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवाजी वाघ, अजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
येरवळे शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन
कऱ्हाड : कोळे (ता. कऱ्हाड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. माजी सरपंच सुभाषराव पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी ‘कृष्णा’चे माजी संचालक सर्जेराव लोकरे, माजी सरपंच पांडुरंग यादव, ग्रामपंचायत सदस्य कविता यादव, मंगल कुंभार, तानाजी यादव, राहुल राऊत, राजेंद्र वाघमारे, दिलीप यादव, बजरंग यादव, शंकर कुंभार, दादासाहेब यादव, संजय यादव, बापूराव यादव, गणेश पवार, हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष उत्तम पाटील, के. पी. यादव, तानाजी वास्के, ज्ञानेश्वर लोकरे उपस्थित होते.
राजाभाऊ काळे यांचा निवडीबद्दल सत्कार
कऱ्हाड : पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे यांची जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव जगताप, शिवप्रेमी मनोहर यादव, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव कोळेकर, आनंद गुरव, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, अनिल भोसले, गणेश मोरे, मंगेश पाटणकर, सुरेश संकपाळ, राजेंद्र साळुंखे, विक्रम मोहिते, सागर माळी, हरिश तवटे, महेश साळुंखे, राजेंद्र कोळी आदी उपस्थित होते.