सातारा : सातारा जिल्ह्यात भाजपचा एकही खासदार व आमदार नसताना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या जोश व उत्साहामुळे इतर कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.भाजपच्या ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ या अभियानानंर्तग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक, कोल्हापूर, सातारा, माढा व गोव्यातील लोकसभा मतदारसंघातील बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सातारा भाजपच्या वतीने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा आरती देवरे यांनी नरेंद्र मोदींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्यात शेती, सिंचन आणि शेतकरी आत्महत्येला काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार जबाबदार आहे. त्याचे उत्तर १५ वर्षे केंद्रात कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवारांनी द्यावे, अशी टीका मोदी यांनी केली.केंद्र व राज्य सरकारकडून शेतकºयाला सक्षम करण्यासाठी केल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपासून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे कौतुक केले. यंदा अपेक्षित पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी राज्य व केंद्र सरकार खांद्याला खांदा लावून काम करेल, अशी ग्वाही दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे समजल्यानंतर सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.लक्ष्मणराव इनामदारांच्या आठवणींना उजाळामोदी यांनी आपले गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘माझ्या जीवनात इनामदारांचे (वकीलसाहब) यांचे मोलाचे योगदान आहे,’ त्यांच्यासोबत तसेच गुजरातमध्ये काम करत असताना सातारा जिल्ह्यात अनेकवेळा येणे झाले. आगामी काळात पुन्हा सातारला यायला निश्चितच आवडेल, अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या
साताऱ्याचा उत्साह पाहून इतरांना प्रेरणा, मोदींनी दिला गुरुंच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:56 PM