सातारा : साताºयासह जिल्ह्यात नवरात्रोत्सवास गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. साताºयात सकाळपासून मिरवणूक काढून भव्य अशा दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर साताºयाची बाजारपेठ फुलली आहे. राजवाडा परिसरात घट, पान-फुले, काळी माती विक्रीसाठी आली आहे. घरोघरी स्वच्छता करुन घटस्थापना करण्यात महिला मग्न आहेत.
घरोघरच्या घटस्थापनेबरोबरच जिल्ह्यातील देवींच्या मंदिरातही घटस्थापना करण्यात आली. मांढरगडची काळूबाई, औंधची यमाई, साताºयाची कमळाई, घाटाई, कºहाडची कृष्णामायी मंदिरातही घटस्थापना करण्यात आली आहे.
साताºयातील नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट म्हणजे गणेशोत्सवाप्रमाणे मंडप उभारुन दुर्गामूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सकाळपासूनच सवाद्य मिरवणूक काढून विविध रुपातील दुर्गामूर्ती मंडपात आणण्यात आली.