सातारा : आदिमाया, आदिशक्ती दुर्गामातेच्या मूर्तींची ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी करण्यात आलेल्या घटस्थापनेने नवरात्रास उत्साही वातावरणात प्रारंभ झाला.
शहर आणि जिल्ह्यात बुधवारी नवरात्र उत्सवास उत्साहात सुरुवात झाली. शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी दुर्गामातेच्या जयघोषात मिरवणुका काढून देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देवीच्या विविध शक्तिस्थळांहून ज्योती आणल्या. साताऱ्यातील मिरवणुकांना सकाळीपासून ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली. कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांनी वातावरण दुमदुमत होते. सकाळी घरोघरी घटस्थापनाही करण्यात आली. घटांना पहिल्या दिवशी खाऊच्या पानांची माळ घालतात, तर दुसºया दिवसापासून दररोज कारळ्याच्या फुलांची माळ घातली जाते.
जिल्ह्यातील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तसेच नवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी गरबा, दांडियाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत. आता आगामी नऊ दिवस संगीताच्या तालावर दांडियाच्या निमित्ताने तरुणाईची पावले थिरकणार आहेत. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गरबा दांडियाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. काही मंडळांनी विद्युत रोषणाईसह आकर्षक देखावे सादर केले आहेत. शहरातील विविध सार्वजनिक मंडळांमध्ये नवरात्रीनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. यावर्षीही विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रास-दांडियाही रंगणार आहेत. सार्वजनिक मंडळांपुढे तसेच विविध मैदानांवर दांडिया कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नवरात्रोत्सवात दहा ते पंधरा टक्के वाढ..नवरात्रोत्सव काळात लागणाऱ्या साहित्यांना यंदा १० ते १५ टक्के दरात वाढ झाले आहे. यामध्ये घट, नाडापुडी, सप्तधान्य, माती, पत्रावळी, खाऊची पाने आदींच्या किमतीत वाढल्या आहेत. पूर्वी एका घटाला २० तर आता ३० रुपये. खाऊची पाने दहा रुपयाला पंचवीस मिळायचे आता वीस रुपयांना मिळत आहेत.
प्लास्टिकबंदीमुळे पत्रावळीच्या दरात वाढशासनाने प्लास्टिकबंदी आणल्याने यंदा पत्रावळीच्या मागणीत वाढ झाली असून, इंधन दरवाढीमुळे त्याच्या किमतीत सुमारे तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी ३० ते ४० रुपयांत पत्रावळ्या ६० ते ७० रुपयांना मिळत आहेत. यामुळे यंदा पत्रावळीच्या दरात तीस टक्के वाढ झाली आहे.
दरबार मिरवणुकीने दुर्गामातेची प्राणप्रतिष्ठाखंडाळा : आदिशक्तीचा महिमा जाणून घेणारा उत्सव म्हणून नवरात्रोत्सवाकडे पाहिले जाते. खंडाळा शहरातील दुर्गोत्सव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नवरात्रोत्सवासाठी परिचित आहे. घटस्थापनेला शहरातून भव्य दरबार मिरवणूक काढून दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. खंडाळा नवरात्रोत्सवाची भव्यदिव्य अशी ढोल पथकाच्या निनादात, हलगीचा कडकडाट, अंगावर रोमांच आणणाºया मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, वाघ्यामुरळीच्या नृत्याचा ठेका, पोतराज नृत्य, विविध ऐतिहासिक, पौराणिक देखावे, उंट, घोड्यांसहित भव्य अशी डोळ्यांचे पारणे फेडणारी मिरवणूक शहरातून काढण्यात आली.कऱ्हाडात ढोल-ताशांच्या निनादात देवीची मिरवणूककऱ्हाड : ढोल-ताशांच्या निनादात ‘उदे गं अंबे उदे,’ असे म्हणत दुर्गामातेच्या मूर्तीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून बुधवारी कºहाड येथे सार्वजनिक मंडळातील कार्यकर्त्यांकडून प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरी करण्यात आलेल्या घटस्थापनेने नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.कºहाड शहर व तालुक्यात बुधवारपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांनी दुर्गामातेच्या जयघोषात मिरवणूक काढून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. कºहाड शहरातील सोमवार पेठेतील कुंभारवाड्यामधून शहरासह परिसरातील सार्वजनिक मंडळांकडून सकाळपासून रात्रीपर्यंत दुर्गादेवीच्या मूर्ती वाजतगाजत नेण्यात आल्या.नवरात्रोत्सवानिमित्त कºहाड शहरातील अनेक मंडळांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. तसेच गरबा, दांडियाचे कार्यक्रम सुरू होणार असल्याने यासाठी तरुणाईकडून दांडियाचा सरावही केला जात आहे. दुर्गादेवी उत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांकडून विद्युत रोषणाईसह आकर्षक देखावेही उभारण्यात आलेले आहे.पोलिसांच्या गलथान कारभारामुळे कºहाड शहरात बुधवारी दुर्गादेवी घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनांची पंतांचा कोट येथे बालाजी मंदिरासमोर वाहतूक कोंडी निर्माण झाली. पोलिसांना वाहतुकीवर नियंत्रण न करता आल्यामुळे देवी घेऊन जाणाºया भाविकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला.