सुपने, ता. कऱ्हाड येथे तांबवे जिल्हा परिषद गट व सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांची बैठक आयोजित केली होती. त्या वेळी प्रांताधिकारी दिघे बोलत होते. या वेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, मंडल अधिकारी पंडित पाटील, डॉ. सुशांत सावंत उपस्थित होते.
प्रांताधिकारी उत्तम दिघे म्हणाले, प्रत्येक ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी लागणारा खर्च पंधराव्या वित्त आयोगातून करावा. ग्रामस्थांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन विलगीकरण कक्ष उभारण्यासाठी जमेल ती मदत करावी.
लोकसहभागातून किवळ, तळबीड येथे कक्ष सुरू केले आहेत. त्यांचा आदर्श घ्यावा. गावातील डॉक्टरांना तेथील लोकांची काळजी घेण्यास सांगावे, असे या वेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी, पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून विलगीकरण कक्षाचा खर्च करावा, असे सांगितले. गावोगावी विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींना शासनाने आदेश दिले आहेत. ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाबरोबरच या कक्षातील खर्चासाठी शासनाने स्वतंत्र निधी तातडीने उपलब्ध करावा, अशी मागणी तांबवेचे उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील यांनी केली. सरपंच यांनी विलगीकरण कक्षातील अडचणी या वेळी मांडल्या. अधिकाऱ्यांनी शंकांचे निरसन केले.
फोटो : ३१केआरडी०३
कॅप्शन : सुपने, ता. कऱ्हाड येथे आयोजित सरपंच बैठकीत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांचे भाषण झाले.