मलकापूर : येथील पालिकेची २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना शहरात राबविण्यासाठी आलेल्या अडचणी व विविध संकल्पनेतून गेली ११ वर्षे योजना चांगल्या पध्दतीने राबवली. हे योजनेचे यश जाणून घेण्यासाठी नुकतेच आंतरराष्ट्रीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत जगभरातून २ लाख २४ हजार अधिकाऱ्यांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी ११ वर्षांतील योजनेचा लेखाजोखा मांडला, अशा पद्धतीने जागतिक पातळीवर सादरीकरणाची संधी मिळणे हा मलकापूरवासीयांना आभिमानाची बाब आहे.
हैद्राबाद येथील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया ही संस्था देशातील नवनवीन संकल्पनांचा शोध व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांसह संस्थांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करते. मलकापूर २४ बाय ७ योजनेची यशस्विता जगभरातील अधिकाऱ्यांना माहिती होण्यासाठी या संस्थेने नुकतेच आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये ओडिसा नगरविकास विभागाचे प्रधान सचिव जी. मथी वयनन्, फ्रेंच येथील पर्यावरण संवर्धन संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अनथुला, इंग्लंडचे आंतरराष्ट्रीय सल्लागार डॉ. रिचर्ड फ्रान्सी व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत जगातील इंजिनिअर्स, अधिकारी असे एकूण २ लाख २४ हजार जणांनी ऑनलाइन सहभाग घेतला होता.
मलकापूर नळपाणीपुरवठा योजनेमध्ये अनेक नावीन्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. संपूर्ण शहरामध्ये ग्राहकांच्या वॉटर मीटरचे रीडिंगच्या मदतीने मोटारसायकलवरून फिरून घेतले जाते. संगणकीय मासिक प्रणालीद्वारे ग्राहकांची पाणीबिले तयार केली जातात. यामध्ये ग्राहकांनी त्यांचे बिल दिलेल्या मुदतीत भरल्यास त्यांना पाणीबिलात दहा टक्के सूट दिली जाते. पाणीबिले भरण्यासाठी शहरात सात ठिकाणी कलेक्शन सेंटर असून महिला बचत गटाअंतर्गत पाणीबिल वसुली केली जाते. या पद्धतीने इतर शहरामध्ये योजना का राबविल्या जात नाहीत? याबाबत या कार्यशाळेत चर्चा केली. यावेळी उपनगराध्यक्ष शिंदे यांनी लोकसहभाग महत्त्वाचा असून, पॉलिटिकल व्ह्यू व नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. योजना राबविण्यासाठी सुरुवातीपासून आलेले अनुभव सर्वांसोबत शेअर केले. २००८ पासून आजअखेर सक्षमपणे ही नळपाणीपुरवठा योजना सातत्याने सुरू असून या योजनेला सन २०१०-११ च्या पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित केले असल्याचे सांगितले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी मलकापूरच्या या योजनेच्या यशस्वीतेचे कौतुक केले.
१८मलकापूर
मलकापूर २४ तास पाणीपुरवठा योजनेचे आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सादरीकरण केले. यामध्ये जगभरातून २ लाख २४ अधिकाऱ्यांचा सहभाग घेतला होता.
180821\img_20210816_170612.jpg
फोटो कॕप्शन
मलकापूर चोवीसतास पाणीपुरवठा योजनेचे आंतरराष्ट्रीय वेबीनारमध्ये उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सादरीकरण केले. यामध्ये जगभरातून २ लाख २४ अधिकाऱ्यांचा सहभाग घेतला होता.