शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

Satara- आंतरराष्ट्रीय संरक्षित असलेले ‘स्टार कासव’ आढळले कऱ्हाडात, तस्करीचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 12:29 PM

वनविभागाने घेतले ताब्यात

कऱ्हाड : आंतरराष्ट्रीय स्तरावर खरेदी-विक्रीसह पाळण्यास बंदी असलेले स्टार कासव कऱ्हाड शहरात शनिवारी रात्री बेवारस आढळून आले. कोणीतरी मुद्दामहून ते कासव बेवारस स्थितीत सोडल्याची शक्यता असून, तस्करीचा संशय वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित कासव वनविभागाने ताब्यात घेतले आहे. तसेच त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रविवार पेठेत असलेल्या काझीवाडा येथे एक दुर्मीळ कासव असल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन त्या कासवाला ताब्यात घेतले. तसेच याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनक्षेत्रपाल कऱ्हाड तुषार नवले, वनरक्षक कैलास सानप यांनी त्याठिकाणी भेट देत कासव ताब्यात घेतले.संबंधित भारतीय स्टार कासव ही एक दुर्मीळ प्रजाती असून, या प्रजातीस कोरडे, रेताड, खडकाळ हवामान लागते. गवत, फळे, फूल आणि झाडांची पाने हा त्यांचा आहार असतो. हे कासव प्रामुख्याने गुजरातमधील कच्छ, राजस्थान, ओडिसा, मध्य महाराष्ट्र याठिकाणी आढळते. हे कासव पाळणे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार प्रतिबंधित आहे.कऱ्हाडात हे कासव कोणी आणले, याबाबतचा तपास वनविभागाकडून केला जात आहे. तस्करीच्या माध्यमातून ते आणण्यात आले असावे, असा वनाधिकाऱ्यांचा अंदाज आहे. त्यानुसार त्याचा तपास केला जात आहे. उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून संबंधित स्टार कासवाचे त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे.

सात वर्ष कारावासाची तरतूदस्टार कासव ही प्रजाती वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार शेड्यूल १ भाग ‘क’मध्ये समाविष्ट आहे. याची विक्री करणे, पाळणे, शिकार करणे याला कायद्यात १० हजार रुपये दंड व सात वर्ष कारावास अशा शिक्षेची तरतूद आहे.

स्टार कासवांच्या खरेदी-विक्रीच्या अवैध व्यवहारातील काळी बाजू म्हणजे हे कासव लहान असेपर्यंत घरात ठेवले जाते. अनेकदा ते मोठे झाले की, घराबाहेर पाणथळ जागी सोडून दिले जाते. एवढेच नाही तर पेट शॉपच्या बाहेरही कासवे सोडून दिलेली आढळली आहेत. स्टार कासव पाळणे, बाळगणे आणि विक्री हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे. -रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, सदस्य, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो

 

स्टार कासवाचे वैशिष्ट्य

  • स्टार कासवाच्या पाठीवर पिवळ्या आणि काळ्या रंगाची सुंदर आकृती असते.
  • हे चित्र पिरॅमिडसारखे दिसते. त्याचे सौंदर्य पाहूनही काही लोक या कासवांची तस्करी करतात.
  • स्टार कासवाच्या खरेदी-विक्रीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी जाहीर झाली आहे.
  • स्टार कासव हा वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षित वर्गातील प्राणी आहे. 
टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग