शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 7:50 PM

Crimenews Police Satara- सासवड (ता. फलटण ) या भागातील एच. पी. कंपनीची पेट्रोलची पाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा लोणंद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटकेत सात जणांना अटक, सासवडच्या शेतमालकाचाही समावेश

लोणंद  : सासवड (ता. फलटण ) या भागातील एच. पी. कंपनीची पेट्रोलची पाईपलाईन फोडून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा लोणंद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यातील सात जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत लोणंद पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनिल हरिशंकर पाठक ( रा. मुळगाव पिंडराई पटखान जि. वाराणसी उत्तर प्रदेश ) बाळू अण्णा चौगुले (रा. रामनगर चिंचवड, पुणे ) मोतीराम शंकर पवार ( रा. गवळीमाता भोसरी पुणे), इस्माईल पीर मोहम्मद शेख (रा. डी मार्ट शेजारी पिंपरी पुणे), शिवाजी कानडे ( रा. वाल्हेकरवाडी चिंचवड), दत्तात्रय सोपान लोखंडे (रा. सासवड), ज्ञानदेव नामदेव जाधव (रा. दालवडी ता. फलटण) यांचा समावेश आहे. दत्तात्रय लोखंडे हा जमीन मालक आहे.याबाबत अधिक माहिती अशी, सासवड गावच्या हद्दीतून जमिनीच्या खालून जाणारी एचपी कंपनीची पेट्रोलची पाईपलाईनला फोडून पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. २३ फेब्रुवारी २०२१ रोजी ही घटना घडली होती. यावेळी दोन हजार लिटर पेट्रोल शेजारच्या ज्वारीच्या शेतात पसरल्याने जमिनीत मुरले तसेच पेट्रोल आजूबाजूच्या विहिरीत उतरल्यामुळे शेतीचेही मोठे नुकसान होऊन कंपनीचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते.पेट्रोल चोरीच्या या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत यातील सराईत आंतरराज्य टोळीतील सात आरोपी निष्पन करून त्यांना गुन्हे शाखा क्रमांक दोन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्या मदतीने पिंपरी-चिंचवड परिसरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले.इंटररोगेशन स्किलचा वापर करून यामधील संशयितांकडे तपास केला असता सातही आरोपींनी सदरचा गुन्हा कबूल केला आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.या आरोपींनी अशा प्रकारचे पेट्रोल चोरी सारखे गुन्हे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.या गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे अजयकुमार बन्सल यांनी सांगितले असून पेट्रोल चोरीच्या गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस