म्हसवड : भारतीय जनता पार्टीसह महायुतीमध्ये असणाऱ्या घटक पक्षानेही आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांस विधानसभेची उमेदवारी द्यावी. उमेदवार आयात करू नये अशी जोरदार मागणी करून दलालांच्या मध्यस्थीने येणाऱ्यांपासून पक्षाने सावध रहावे, अशी मागणी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली.दहिवडी ता. माण येथे नुकतीच माण खटाव तालुक्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक डॉ. महादेव कापसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब खाडे, उपाध्यक्ष डॉ. उज्वल काळे, खटाव तालुकाध्यक्ष अनिल भोसले, सतिश शेटे, डॉ. हेमंत पेठे, गणेश चिंचकर, सरचिटणीस विजय साखरे, बाळासाहेब मासाळ आदी उपस्थित होते. बैठकीत अशी मागणी करण्यात आली की महायुतीतील घटक पक्षातील उमेदवारास उमेदवारी द्यावी उपरा उमेदवार नको. आयात उमेदवार दिल्यास जनता त्याला स्विकारणार नाही. जनमत हे महायुतीच्या बाजुने आहे. तेव्हा उमेदवार आयात केल्यास जनतेचा विश्वासघात होईल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.भाजपाच्यावतीने डॉ. महादेव तपासे, बाळासाहेब मासाळ, विजय साखरे यांना खटाव मधून तर सतिश शेटे, जालिंदर माळी, डॉ. हेमंत पेठे यापैकी कोणालाही उमेदवारी देवून महायुतीचा उमेदवार निवडुन आणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)दहा गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांच्या ताब्यातसापळा रचून उंब्रज पोलिसांची कारवाईउंब्रज : सातारा, उंब्रज, बोरगाव, पुसेगाव येथे सुमारे १० गुन्हे दाखल असणाऱ्या एका आरोपीस उंब्रज पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संशयिताचे नाव अमित सुनील साळुंखे (२५) रा.नागठाणे, ता. जि. सातारा असे आहे.याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज दुपारी उंब्रज येथे अमित साळुंखे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक मारुती पाटील व पो. हवालदार संपत भोसले, सुनिल पोळ, अतुल जाधव, यांनी सापाळा रचून अमित साळुंखे याला ताब्यात घेऊन अटक केली.संबंधित आरोपीवर जबरी चोरी, अपहरण, मारामारी असे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात नोंद आहेत. हा आरोपी अनेक दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. साताऱ्या सह उंब्रज, बोरगाव, पुसेगाव येथील पोलीस त्याच्या मागावर होते. परंतू त्याचा कोणात सुगावा पोलिसांना लागत नव्हता.अनेक वेळा तो हाताशी येई अशी खात्री वाटत असताना तो चकवा देण्यात यशस्वी ठरत होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस पुढील तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
दलालांच्या मध्यस्थीने
By admin | Published: July 08, 2014 11:40 PM