साताऱ्यात विधानसभेसाठी काँग्रेसमधील इच्छुकांच्या उद्या मुलाखती 

By नितीन काळेल | Published: October 3, 2024 06:35 PM2024-10-03T18:35:04+5:302024-10-03T18:35:46+5:30

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसने जोरदार तयारी केली असून सातारा जिल्ह्यातील १० इच्छुकांच्या मुलाखती उद्या शुक्रवारी (दि.४) सकाळी ...

Interviews of Congress aspirants for Assembly in Satara tomorrow  | साताऱ्यात विधानसभेसाठी काँग्रेसमधील इच्छुकांच्या उद्या मुलाखती 

साताऱ्यात विधानसभेसाठी काँग्रेसमधील इच्छुकांच्या उद्या मुलाखती 

सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेसने जोरदार तयारी केली असून सातारा जिल्ह्यातील १० इच्छुकांच्या मुलाखती उद्या शुक्रवारी (दि.४) सकाळी निरीक्षक तथा सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे घेणार आहेत. यामुळे आघाडीत काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकल्याचे स्पष्ट होत आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. त्याची यादी प्रदेश कार्यालयाकडेही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रम १ ते ८ ऑक्टोबदरम्यान जिल्हास्तरावर होत आहे. सातारा जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

निरीक्षक प्रणिती शिंदे या शुक्रवार, (दि. ४) सकाळी काँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यानंतर दि. १० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांच्या मुलाखतीचा गोपनीय अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई यांनी दिली.

मतदारसंघनिहाय काँग्रेसकडील इच्छुक..

फलटण - ज्ञानदेव वरपे
वाई - समिता गोरे, जयदीप शिंदे, कल्याण पिसाळ-देशमुख, विराज शिंदे
माण - प्रा. विश्वंभर बाबर, रणजितसिंह देशमुख
कऱ्हाड उत्तर - निवास थोरात
कऱ्हाड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण
पाटण - नरेश देसाई
सातारा - समिता गोरे

Web Title: Interviews of Congress aspirants for Assembly in Satara tomorrow 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.