शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीला अडकविण्यासाठी मेहुण्याचा 'मास्टर प्लॅन', प्रेयसीला संपवून अडकवायचे होते दाजीला! पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 5:51 PM

चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी भयावह आणि उत्कंठा निर्माण करणारी घटना कऱ्हाड तालुक्यातील कोरेगावात घडली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला; पण हत्या झालेली युवती कोण, येथूनच तपासाला सुरुवात झालेली.

संजय पाटील

कऱ्हाड : बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीला अडकविण्यासाठी त्याने ‘प्लॅन’ केला. काट्यानेच काटा काढायचे ठरवून त्याने सुरुवातीला प्रेयसीला संपवले आणि तिच्याजवळ दाजीच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून तो पसार झाला. एवढे सगळे केल्यावर दाजी हमखास अडकेल, असे त्याला वाटलेले; पण पोलिसांनी त्याला गाठलेच.

चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी भयावह आणि उत्कंठा निर्माण करणारी घटना कऱ्हाड तालुक्यातील कोरेगावात घडली. उसाच्या फडात युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला; पण हत्या झालेली युवती कोण, येथूनच तपासाला सुरुवात झालेली. युवतीच्या कपड्यात आढळलेल्या चिठ्ठीवर एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख होता. त्यामुळे त्या व्यक्तीचा आणि या युवतीचा संबंध काय, असा प्रश्न निर्माण झाला.पोलिसांनी तातडीने त्यांनी त्या व्यक्तीला गाठले; पण ती व्यक्ती संबंधित युवतीला ओळखतच नव्हती. त्यामुळे पोलीस थबकले. पुढे काय, हा प्रश्न असतानाच त्या व्यक्तीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मेहुणा शरद ताटे याने ही हत्या केली असावी, असा संशय त्याने व्यक्त केला. त्यामुळे पोलिसांनी थेट मेहुण्यालाच गाठले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर घटनेची एक-एक कडी सुटत गेली. शरद ताटे याने ही हत्या केली असून दाजीला त्यामध्ये अडकविण्याचा त्याचा कट होता, असे तपासातून स्पष्ट झाले.

येरवळे ते कोरेगाव ‘व्हाया’ बेलवडे

शरद ताटे हा येरवळेत राहतो. तर प्रेयसी बेलवडे हवेलीत राहण्यास होती. रविवारी सायंकाळी शरद दुचाकीवरून बेलवडेत गेला. तेथून दोघे कोरेगावमध्ये आले होते.

‘ती’ नकोशी झालेली..!

शरदने ज्या युवतीची हत्या केली तिच्याशी त्याचे संबंध होते. मात्र, सध्या ती त्याला नकोशी झालेली. त्यामुळे तिला संपवायचे आणि दाजीला अडकवायचे, असा शरदचा कट होता.

दोघांनी केले मद्यप्राशन

ज्या शिवारात शरदने प्रेयसीची हत्या केली ते ठिकाण निर्जन असते. याच संधीचा गैरफायदा घेत रात्री साडेसात वाजता त्या ठिकाणी पोहोचलेल्या शरदने प्रेयसीची हत्या केली. मात्र, तत्पूर्वी त्या दोघांनी तेथेच बसून मद्यप्राशन केले.

आधी गळा दाबला, नंतर दगड घातला!

शरदने आधी युवतीचा गळा दाबला. त्यामध्ये मृत्यू होऊन तीची हालचाल थांबलेली; पण तरीही ती जिवंत राहूच नये, यासाठी त्याने दगड उचलून तिच्या डोक्यात घातल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारी