एकनाथ माळी- तारळे--उद्घाटन होवूनही तारळे, बांबवडे उपसा सिंचन योजना दोन वर्षांपासून धुळखात पडल्या आहेत. पोटपाटाच्या कामाचा नारळच न फुटल्याने कोट्यावधींच्या योजना, पंपहाऊस व यंत्रसामुग्री बेवारस बनली असून या योजना म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ अशा बनल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगले आहे.तारळी धरणातून वाहणारे पाणी नदीपात्रात कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. त्यातून शासन खर्चाने पन्नास मीटर हेड पाणी उचलून उपसा सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीला देण्यात येणार आहे. पाच योजना प्रस्तावित असून तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजना दोन वर्षांपूर्वी पूर्ण होवून त्यांची उद्घाटने झाली आहेत; पण अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे दोन्ही योजनांच्या पोटपाटाच्या कामाला सुरूवात न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन्ही योजनांखाली येणाऱ्या क्षेत्रात बहुतांशी शेतकऱ्यांनी स्वत:च्या खर्चाच्या योजना केल्या आहेत. तरीही अंदाजे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलीताच्या प्रतिक्षेत आहे. तारळी धरणाच्या पाण्यावर भविष्याची स्वप्ने शेतकऱ्यांमधून बघण्यात येत आहेत; पण शासकीय अनास्थेमुळे दोन वर्षांपासून या योजना अडगळीत पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हिरवाईचे स्वप्न कोसो दूर असून यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच राजकीय यंत्रणेतसुध्दा अनास्था असल्याचे दिसते. दोन वर्षांपासून पोटपाटाच्या कामाचा सर्वेच झाला नसल्याची कबूली अधिकाऱ्यांनीच दिल्याने नक्की त्यांचा कारभार कसा दिशाहिन आहे, हे दिसून येत आहे. पोटपाटाचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधितांकडे वेळच नव्हता तर सरकारचे पर्यायाने गोरगरीब जनतेचे कोट्यावधी रूपये खर्च करून उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याची गरज काय होती, असा सवाल विचारण्यात येत आहे. कुणाचे हितसंबंध जपण्यासाठी का कुणाचे भले करण्यासाठी या हत्तीखाना असणाऱ्या योजना गोरगरीबांच्या माथी लादण्यात आल्या आहेत. उपसा सिंचनच्या पंपहाऊसलाच कोरड !तारळे, बांबवडे योजना धुळखात पडून : उद्घाटन होऊनही पोटपाटाअभावी योजना बंद; शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीच्या स्वप्नांचा चुराडाएकनाथ माळी ल्ल तारळेउद्घाटन होवूनही तारळे, बांबवडे उपसा सिंचन योजना दोन वर्षांपासून धुळखात पडल्या आहेत. पोटपाटाच्या कामाचा नारळच न फुटल्याने कोट्यावधींच्या योजना, पंपहाऊस व यंत्रसामुग्री बेवारस बनली असून या योजना म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’ अशा बनल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न भंगले आहे.तारळी धरणातून वाहणारे पाणी नदीपात्रात कोल्हापूरी पध्दतीचा बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. त्यातून शासन खर्चाने पन्नास मीटर हेड पाणी उचलून उपसा सिंचन योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या शेतीला देण्यात येणार आहे. पाच योजना प्रस्तावित असून तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजना दोन वर्षांपूर्वी पूर्ण होवून त्यांची उद्घाटने झाली आहेत; पण अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे दोन्ही योजनांच्या पोटपाटाच्या कामाला सुरूवात न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन्ही योजनांखाली येणाऱ्या क्षेत्रात बहुतांशी शेतकऱ्यांनी स्वत:च्या खर्चाच्या योजना केल्या आहेत. तरीही अंदाजे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलीताच्या प्रतिक्षेत आहे. तारळी धरणाच्या पाण्यावर भविष्याची स्वप्ने शेतकऱ्यांमधून बघण्यात येत आहेत; पण शासकीय अनास्थेमुळे दोन वर्षांपासून या योजना अडगळीत पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हिरवाईचे स्वप्न कोसो दूर असून यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच राजकीय यंत्रणेतसुध्दा अनास्था असल्याचे दिसते. दोन वर्षांपासून पोटपाटाच्या कामाचा सर्वेच झाला नसल्याची कबूली अधिकाऱ्यांनीच दिल्याने नक्की त्यांचा कारभार कसा दिशाहिन आहे, हे दिसून येत आहे. पोटपाटाचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधितांकडे वेळच नव्हता तर सरकारचे पर्यायाने गोरगरीब जनतेचे कोट्यावधी रूपये खर्च करून उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याची गरज काय होती, असा सवाल विचारण्यात येत आहे. कुणाचे हितसंबंध जपण्यासाठी का कुणाचे भले करण्यासाठी या हत्तीखाना असणाऱ्या योजना गोरगरीबांच्या माथी लादण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या अनास्थेने अडगळीत पडलेल्या तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनांसाठी सुमारे चोवीस कोटींचा निधी जिरवण्यात आला आहे. यासाठी अधुनिक यंत्रसामुग्री वापरण्यात आली असून दोन वर्षात त्याची दुरवस्था झाली आहे.तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या पोटपाटाची कामे करण्यासंदर्भात गतवर्षी आमच्या कण्हेर विकास विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. आमच्या विभागाला स्वतंत्र निधी उपलब्ध होत नाही. उपविभागाकडून मिळणाऱ्या फंडावरच काम करावे लागते. तारळे उपसा सिंचन योजनेचा सर्व्हे पूर्ण होवून प्लॅन, इस्टिमेट तयार झाले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या पोटपाटाच्या कामाला विलंब झाला आहे. दोन्ही योजना पूर्ण होण्यासाठी निधीची मागणी केली असून लवकरात लवकर कामांना सुरूवात होईल. - वैष्णवी नारकर कण्हेर विकास विभाग, सातारा
उपसा सिंचनच्या पंपहाऊसलाच कोरड !
By admin | Published: May 28, 2015 9:58 PM