पुसेसावळी : ‘खटाव तालुक्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीमध्ये प्रत्येक गावाने आपल्या गावात कोरोना सेंटर उभे करणे गरजेचे आहे,’ असे आवाहन चोेराडे उपकेंद्राचे डॉ. सुहास कुंभार यांनी केले.
खटाव तालुक्यातील चोराडेमध्ये युवकांच्या लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सुरु झालेल्या कोरोना आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन चोराडे उपकेंद्राचे डाॅ. सुहास कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चोराडे गावातील सोसायटी चेअरमन सतीश पिसाळ, माजी व्हा. चेअरमन शांताराम पिसाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिसाळ, माजी चेअरमन विजय पिसाळ, नवनाथ पिसाळ, सोसायटी सदस्य विलास पिसाळ, प्रशांत पिसाळ, विजय लक्ष्मण पिसाळ, अनमोल गुरव, अशोक पिसाळ, नंदकुमार पिसाळ, रवींद्र पिसाळ, अभिजीत पिसाळ, सचिन पिसाळ, विष्णूपंत पिसाळ, सेविका, आशा सेविका, तलाठी भादुले, अंगणवाडी सेविका शकिला मुल्ला, कविता पिसाळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोना काळात गावातील अनेक युवकांकडून मदतीचा ओघ सुरू झाल्यामुळे आयसोलेशन सेंटरसाठी लागणारे बेड, औषधे, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, मास्क, वाफारा मशीन व इतर साहित्य या सेंटरला देण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, हे सेंटर होणे अत्यंत गरजेचे होते. त्याप्रमाणे युवावर्गाच्या मदतीने हे आयसोलेशन सेंटर सुरू झाले. या सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. ज्यांना गृह अलगीकरणामध्ये राहण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे, अशा रुग्णांनी या आयसोलेशन सेंटरमध्ये येऊन आपल्या घरातील लोकांचे आरोग्य जपले पाहिजे. या उपक्रमात सहभागी युवकांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. आयसोलेशन सेंटरमध्ये रुग्णांनी उपचारासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
===Photopath===
160521\img_20210515_231303.jpg
===Caption===
चोराडे येथे आयसोलेशन सेंटरचे उद्घाटन करताना चोराडे उपकेंद्राचे डाॅ.कुंभार सर चेअरमन सतीश पिसाळ शांताराम पिसाळ
विजय पिसाळ नवनाथ पिसाळ श्रीकांत पिसाळ