सातारा : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास तर सातारा शहर व परिसरात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणीही पाऊस बरसला.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा वळवाचा पाऊस होत आहे. २० दिवसांपूर्वी पाऊस आणि जोरदार गारपीट झाली होती. त्यानंतर मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस होत आहे. सातारा शहरात तर गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. तसेच पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. मात्र, जोरदार पाऊस झालाच नाही. असे असले तरी ढगांचा गडगडाट जोरात होता. त्याचबरोबर सातारा शहर व परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत विजा चमकत होत्या. या पावसामुळे हवेतील उकाडा कमी झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस झाला. ढगांच्या गडगडाटसह वळवाचा पाऊस पडला. हा पाऊस व गारपीट फळबागांसाठी धोकादायक असली तरी अन्य उन्हाळी पिकांसाठी फायदेशीर ठरत आहे.
फोटो दिनांक २९ सातारा पाऊस फोटो...
फोटो ओळ : सातारा शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वळवाचा पाऊस पडला. यामुळे अंधारून आले होते. (छाया : नितीन काळेल)