शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 2:21 PM

road safety Trafic Satara- सातारा येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.

ठळक मुद्देग्रेड सेपरेटर च्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त ठरला प्रशासनाकडून तयारी : २९ जानेवारी रोजी पुन्हा होणार उद्घाटन

सातारा : येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे.सातारा शहरातील पोवईनाका परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रेड सेपरेटर या महत्वकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला. अनेक वर्ष या ग्रेड सेपरेटरचे काम सुरू होते; परंतु उद्घाटनाविना हा प्रकल्प सुरू होत नसल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिकेतील पदाधिकारी यांना सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले होते. मात्र हे उद्घाटन अधिकृत नसल्याने व शासनाचा कोणताही प्रोटॉकल न पाळता ते झाले असल्याने पुन्हा एकदा रीतसर उद्घाटन करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली.शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. जी. मुलगीलवार, कार्यकारी अभियंता शंकर दराडे आदी उपस्थित राहणार आहेत.ग्रेड सेपरेटर हे साताऱ्यात झालेले उल्लेखनीय काम आहे. पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येत असल्याने वाहनांची कोंडी होत होती, त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून ग्रेड सेपरेटर चे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू होते.पालिकेकडे होणार हस्तांतरणग्रेड सेपरेटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पूर्ण करण्यात आलेले आहे. आता याची देखभाल दुरुस्ती नगरपालिकेने पाहायची आहे. त्यामुळे हा ग्रेड सेपरेटर काही दिवसांत पालिकेकडे हस्तांतरित केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती असून त्याबाबत प्रशासकीय हालचाली देखील सुरू आहेत.आधी सीसीटीव्ही बसवाग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनानंतर लावलेला फलक पाठवून खाली पडला होता. या फलकामुळे सातारा शहरातील वातावरण तंग झाले होते, त्यानंतर संपूर्ण राज्यभर याचे पडसाद देखील उमटले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा फलक फाडून जमिनीवर फेकल्याची अफवा पसरली होती; परंतु एका खासगी इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये हे वस्तुस्थिती समोर आली.

ग्रेड सेपरेटरचे काम करत असताना आतल्या बाजूला कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. सध्या रात्रंदिवस या ग्रेड सेपरेटर मधून वाहतूक सुरू आहे. अनेक धूम स्टाईल बाईक चालक या ग्रेड सेपरेटर मधून गाड्या ठेवत आहेत तसेच काही चारचाकी वाहन चालक देखील अतिशय वेगाने वाहने नेताना दिसत असून अपघात झाला तर त्याची सुतराम कल्पना पोलीस विभागाला लागणे कठीण होईल यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव ग्रेड सेपरेटर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSatara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा